राजकोट शिवपुतळा प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटेला 'या' तारखेपर्यंत पोलिस कोठडी; चेतन पाटीलच्या कोठडीत वाढ

Jaideep Apte : राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली होती.
 Jaideep Apte Police Custody
Jaideep Apte Police Custodyesakal
Updated on
Summary

तांत्रिक सल्लागार पाटील याला यापूर्वीच अटक केली होती तर आपटे हा पसार होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती.

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) गुन्हा दाखल असलेला शिल्पकार व ठेकेदार जयदीप आपटे (Sculptor Jaydeep Apte) याला पोलिसांनी त्याच्या कल्याण येथील घराजवळून ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेत आपल्या कुटुंबीयांना भेटायला आला असता बुधवारी (ता. ४) रात्री उशिरा त्याला पकडले. त्याच्यासह दुसरा संशयित व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याला गुरुवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.