छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबतचा प्रस्ताव सादर केला असून तो युनेस्कोला सादर करण्यात आला आहे. यामध्ये १२ गडकिल्ल्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीया पोस्टद्वारे दिली आहे.
युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी पन्हाळगड, रायगड, शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांचे २०२४-२५ साठी भारताने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’च्या माध्यमातून नामांकन केले आहे. या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात येणार आहे. (forts to be included in the world heritage list?)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडसह साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत. हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नावारुपाला आलेले आहेत. यातील अनेक किल्ल्यांची बांधणी शिवकालात तसेच त्यानंतर झाल्याचे दिसून येते.
कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळागडाचीही शिफारस केली जाणार आहे. इतिहासामध्ये पन्हाळगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. याच किल्ल्याला सिद्धी जोहरने वेढा दिला होता. या वेढ्यातून शिवछत्रपती विशाळगडाच्या दिशेने शिताफीने निसटून गेले होते. पन्हाळगडावर सज्जा कोठी, तीन दरवाजा, अंधारबाव, धर्मकोटी, अंबरखाना, पुसाटी बुरुज दिमाखात उभा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.