दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत.
मालवण : नौदल दिनानिमित्त (Navy Day) राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, तहसीलदार वर्षा झालटे यांनी या घटनेची माहिती नौदल विभागाला कळविण्यात आल्याचे स्पष्ट केले.