कुणी संधी शोधतंय तर कुणी हवेचा वेग... शिवरायांचा पुतळा कोसळला अन् नेत्यांची बेताल वक्तव्य! भाजपचं केंद्रीय नेतृत्व देखील नाराज

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे हे प्रकरण आता केवळ राज्यातील राजकीय मुद्दा राहिला नसून केंद्राच्या दृष्टीनेही महत्वाचे बनले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Protests erupt in Maharashtra after the collapse of Chhatrapati Shivaji Maharaj's statue in Malvan, highlighting public anger and political fallout.
Protests erupt in Maharashtra after the collapse of Chhatrapati Shivaji Maharaj's statue in Malvan, highlighting public anger and political fallout.esakal
Updated on

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर विविध ठिकाणी निषेध आंदोलन होत असून, विरोधकांनी राज्य सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही नाराजी व्यक्त केली असून, राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

केंद्र सरकारची कडक भूमिका-

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांवर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, "राज्य सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने हाताळायला हवे होते. पुतळ्याची योग्य देखभाल करणे आवश्यक होते, जेणेकरून अशी घटना टाळता आली असती." केंद्राच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव आला आहे.

महाविकास आघाडीचा मोर्चा आणि विरोधकांचे रोष-

या घटनेनंतर महाविकास आघाडीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन केले आहे. जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे हे नेते आज मालवणमध्ये मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. विरोधकांनी या घटनेचा फायदा घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, "ही घटना राज्य सरकारच्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे त्यांनी याची जबाबदारी स्वीकारावी."

दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्या विधानांनी संतापात वाढ

घटनेनंतर काही नेत्यांनी दिलेल्या वादग्रस्त विधानांमुळे केंद्रीय नेतृत्व अधिकच नाराज झाले आहे. दीपक केसरकर यांनी म्हटले की, "पुतळा कोसळल्यानंतर चांगला पुतळा बांधण्याची संधी मिळाली आहे." तसेच, "मोदी येणार असल्याने नौदलाकडून घाईत काम करण्यात आले," अशी कबुलीही त्यांनी दिली. यामुळे केंद्र सरकारला राज्य सरकारच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील पुतळा कोसळण्याचे कारण हवामानाच्या परिस्थितीवर टाकले आहे. त्यांनी म्हटले की, "तिथे हवेचा वेग खूप जास्त होता. मोठ्या इमारतीदेखील अशा वेळी कोसळतात. मी बांधकामाचे समर्थन करत नाही, पण हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे." त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे.

Protests erupt in Maharashtra after the collapse of Chhatrapati Shivaji Maharaj's statue in Malvan, highlighting public anger and political fallout.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

राज्यातील संताप-

या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींनी आणि जनतेने राज्य सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापुढे या प्रकरणाची अधिक चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. दरम्यान, विरोधकांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर जोरदार हल्ला चढवला आहे आणि या प्रकरणाचा राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे हे प्रकरण आता केवळ राज्यातील राजकीय मुद्दा राहिला नसून केंद्राच्या दृष्टीनेही महत्वाचे बनले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Protests erupt in Maharashtra after the collapse of Chhatrapati Shivaji Maharaj's statue in Malvan, highlighting public anger and political fallout.
Who is Jayeep Apte: पुतळा कोसळल्यावर काय म्हणाला शिल्पकार जयदीप आपटे? उभारणीचं काम त्याला कोणी दिलं होतं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.