Accident News: आंबोली घाटातील 300 फूट खोल दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू

मृत्यू झालेला पोलिस कर्नाटक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी होता तैनात
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्तासाठी आले आहेत. सुट्टीचा मिळाल्यामुळे छत्तीसगड पोलिस म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले. वाटेत लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा पाय घसरून 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.

गोव्याहून परतत असताना हे तीन पोलिस लघुशंकेसाठी आंबोली घाटातील धबधब्याजवळ थांबले. त्यातील मीतेलेस पॅकेरा हे दरीच्या दिशेने गेले. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाय घसरून ते 300 फूट खोल दरीत कोसळले.

रात्रीच्या अंधारात काय घडलं हे त्याच्यासोबत असणाऱ्या पोलिस सहकाऱ्यांनाही समजलं नव्हतं. त्यांनी आंबोली पोलिस स्थानकात संपर्क केला. आंबोली पोलीस आणि आंबोली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मीतेलेश याला केवळ 30 मिनिटात खाली दरीत उतरत प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.

Accident News
NCP Politics: जुनी भाकरी फिरेना अन्‌ नव्यासाठी पीठही मिळेना! राष्ट्रवादी पदाधिकारी बदल रखडला

रेस्क्यू टीम खाली पोहोचले त्यावेळी मितीलेश थोडे शुद्धीत होते. परंतु काही वेळात त्यांनी प्राण सोडले त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला आहे.

आज मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

Accident News
Accident News : लग्नावरुन परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला! ५ जणांच्या मृत्यू, १५ जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.