सरन्यायाधीशांसोबत आपली ओळख असल्याचं सांगितलं तर टीका होते; असं का म्हणाले फडणवीस?

'मीही आता न्यायदानाची प्रक्रिया वेगवान कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.'
Chief Justice Uday Umesh Lalit
Chief Justice Uday Umesh Lalitesakal
Updated on
Summary

'मीही आता न्यायदानाची प्रक्रिया वेगवान कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.'

मुंबई : भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत (Chief Justice Uday Umesh Lalit) यांचा सत्कार मुंबईतील राजभवनात नुकताच करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आजचा आनंदाचा क्षण आहे. कारण, सरन्यायाधीश लळीत यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान होत आहे. लळीत यांच्याशी माझा 2000 साली संबंध आला होता. लळीत यांनी कमी काळातही अनेक गोष्टी सुरू केल्या, त्यामुळं न्यायदानाच्या प्रक्रियेत सुलभता येतं आहे. अनेक केसेसमध्ये त्यांचं मोठ योगदान राहिलं आहे. सुप्रीम कोर्टात अभ्यासू वकील म्हणूनही त्यांची वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्या कामाचा आदर्श ठेवून मीही आता न्यायदानाची प्रक्रिया वेगवान कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Chief Justice Uday Umesh Lalit
Accident : कामावरुन घरी परताना काळाचा घाला; रिक्षा-ट्रकच्या भीषण धडकेत 7 महिला ठार, तर 6 जण जखमी

सध्याच्या परिस्थितीत सरन्यायाधीशांशी आपली ओळख असल्याचं सांगितलं तर टीका होते. म्हणून, मी यापूर्वी कधी त्यांच्याबाबत सांगितलं नाही. मात्र, आता आज आवर्जुन सांगतोय.. लळीत यांच्याशी माझा 2000 साली संबंध आला होता. ते एक अभ्यासू वकील आहेत. अनेक लँडमार्क केसेसमध्ये त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Chief Justice Uday Umesh Lalit
एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.