Eknath Shinde : मराठी मतांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कर्नाटकात

Eknath Shinde : मराठी मतांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कर्नाटकात
Updated on

मुंबईः कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कर्नाटकाच्या काही भागात मराठी मतं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल यांच्यामध्ये लढत होत आहे. त्या राज्यात सत्ताधारी पक्षाला संधी न देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे यावेळी भाजपला धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Eknath Shinde : मराठी मतांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कर्नाटकात
brijbhushan sharan singh : आधीही राष्ट्रीय स्तरावर खेळले, यापुढेही खेळणार; विनेश फोगाटचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये असलेला मराठीबहुल भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार करणार आहेत. साधारण दोन ते तीन दिवस मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात प्रचार करतील, असं सांगितलं जात आहे.

मागील काही दिवसांपासून कर्नाटकचं राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल 'विषारी साप' असा उल्लेख केल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. खर्गे यांनी नंतर यू टर्न घेत मी विचारसरणीबद्दल बोललो होतो, असा खुलासा केला.

Eknath Shinde : मराठी मतांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कर्नाटकात
New Jamtara : नवीन जामतारा उघड! ५ हजार पोलिसांकडून १४ गावांमध्ये छापेमारी; १२५ जणांना अटक!

काल अमित शाह यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट आणि हत्येच्या घटना घडल्या. परंतु भाजपच्या काळात हे सगळं बंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. शिवाय भाजपने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे टाकल्याचा उल्लेख अमित शाह यांनी केला.

दरम्यान, मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने फंडा आखला आहे. बेळगाव आणि परिसरातील भागातील मतं वळवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रचारसभा आणि बैठका घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.