Eknath Shinde : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हाईसरॉय ॲाफ महाराष्ट्र"

ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टिपून टिपून मारताहेत अशी टीका
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाहीत तर व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता, तो कोणाचंही ऐकायचा नाही तसे हे व्हॉईसरॉय असल्याची अशी खोचक टीका राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नेरुळ मध्ये आगरी कोळी महोत्सवाचं उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टिपून टिपून मारताहेत. मुख्यमंत्र्यांना असे वाटते की अख्खं ठाणे माझ्या हातात असावं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतके वर्ष राजकारण पण त्यांच्या बारामतीत असं कधीच झालं नाही, तर त्यांना साथ दिली नाही तर कुणाचं हॉटेल तोडून टाकलं, कुणाचं घर तोडून टाकलं. म्हणजे ते मुख्यमंत्री नाहीत तर व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

पुढे बोलताना आव्हाड यांनी त्यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याचा दाखला देत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत म्हंटले की, आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते. कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काही अंदाज नाही. गुन्हा कोणताही असू शकतो तोही सांगता येणार नाही. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 72 तासांत दोन गुन्हे दाखल झाले, असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं आहे.

Eknath Shinde
Solapur News: अवैध व्यवसायला पाठबळ कोणाचे? 'गुटखाबंदी' तरीही मावा, गुटख्याची दररोज लाखोंची उलाढाल

सरकार म्हणजे कहर आहे. ज्या पद्धतीने सरकार वागतं आहे. ती पद्धत कौतुकास्पद आहे. हम करो से कायदा ठीक आहे. थोडे दिवस हुकूमशाहीही लोक सहन करतील. हे लोक काय घडवून आणतील याचाही अंदाज सांगता येत नाही. लोकशाहीवर आता विश्वासच नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Eknath Shinde
Amit Shah: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विमानाचं आपत्कालीन लॅडींग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.