Eknath Shinde : माजी सैनिकांसाठी महामंडळ, युद्ध संग्रहालय उभारणार;मुख्यमंत्री शिंदे,कारगिल विजयदिनी हुतात्म्यांच्या वारसांचा, जवानांचा सन्मान

सातारा हा लढवय्यांचा जिल्हा आहे. मिलिटरी अपशिंगे गावाचा केवळ राज्यालाच नव्हे तर देशाला अभिमान आहे. कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबांच्या धैर्याला मी नमन करतो.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

सातारा : सातारा हा लढवय्यांचा जिल्हा आहे. मिलिटरी अपशिंगे गावाचा केवळ राज्यालाच नव्हे तर देशाला अभिमान आहे. कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबांच्या धैर्याला मी नमन करतो. राज्य सरकारने माजी सैनिकांचे महामंडळ, मुंबईत युद्ध संग्रहालय करण्याचा निर्धार केला आहे. सैनिक, माजी सैनिकांच्या सोबत सरकार कायम असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.

येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात सैनिक कल्याण विभागातर्फे आयोजित २५ वा कारगिल विजय दिवस कार्यक्रमात भ्रमणध्वनीद्वारे ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवृत्त जनरल विजय पवार आदी उपस्थित होते. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वारशांचा, अपंगत्व आलेल्या, तसेच शौर्यपदक प्राप्त जवानांचा देसाई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, २५ हजार रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ देऊन या वेळी सन्मान करण्यात आला.

शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘हुतात्मा जवानांच्या सुमारे ५०० कुटुंबीयांना अद्याप जमीन उपलब्ध होऊ शकली नाही, याची आम्हाला खंत आहे. काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडचण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय घेण्यासाठी मी पुढाकार घेईन.’

वीरपत्नी उज्ज्वला महादेव निकम, विद्या सुभाष सानप यांनी मनोगत व्यक्त केले. निकम यांनी ज्या दिवशी जवान महादेव हे हुतात्मा झाले. त्याच दिवशी त्यांना मुलगी झाल्याचे सांगत ऑपरेशन विजयाची प्रेरणा म्हणून मुलीचे नाव विजया ठेवल्याचे अभिमानाने सांगितले. माजी सैनिक शंकर माळवदे यांनी केलेल्या विनंतीनुसार पालकमंत्री देसाई यांनी येत्या स्वातंत्र्यदिनापासून प्रथम मंत्री कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करतील. हीच परंपरा प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्रदिनी देखील कायम राहील. त्यानंतर मंत्री महोदय मुख्य ध्वजवंदनास जातील, असे जाहीर केले. जिल्हा नियोजन समितीतून स्मारकास दीड कोटी रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com