Ajit Pawar: 'अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण; राज्यात ऑपरेशन लोटस सुरु', पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा
Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चेने काल पुन्हा जोर धरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले होते.

दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला होता. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी शांतता राखल्याने चर्चेला बळच मिळाले. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: दौरे रद्दच्या अफवेनंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे म्हटलं आहे.

Ajit Pawar
Kapil Sibal: वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री १० ची? अतिक अहमदच्या हत्येप्रकरणी सिब्बल यांना पडले ८ प्रश्न

अजित पवार काय म्हणाले?

खारघर येथे रविवारी झालेल्या 'महाराष्ट्रभूषण' सोहळ्याच्यावेळी पुरस्कार उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या तसेच उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी 'एमजीएम' हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे, असा खुलासा अजित पवार यांनी ट्विटमार्फत केला आहे. तसेच मंगळवारी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
Dhananjay Munde: धनंजय मुंडे आहेत तरी कुठे? नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.