Traffic: मिसेस मुख्यमंत्री अडकल्या वाहतूक कोंडीत

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे
Traffic: मिसेस मुख्यमंत्री अडकल्या वाहतूक कोंडीत
Updated on

वाहतूक कोंडीचा फटका रोज सर्वसामान्यांना बसतोच. हा सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातला एक भाग बनतो. पण यावेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे तो मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे यांना, मिसेस मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अशा अडकल्या की, गावाला जायला त्यांना दीड तास उशीर झाला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे काल (शुक्रवारी) रात्री महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी निघाल्या होत्या. लिंगमळा ते वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना गाडीतच अडकून राहावे लागले. दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली. त्यात वेण्णालेक परिसरात केवळ दोनच पोलीस वाहतुकीचे नियंत्रण करत होते. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली होती. जवळजवळ दीड तासाने वाहतुककोंडीतून त्यांची सुटका झाली.

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान आता थंडी सुरू होत असल्यामुळे लोक महाबळेश्वर आणि परिसरात पर्यटनासाठी जातात. यामुळे मॅप्रो गार्डन, वेण्णालेक या परिसरात मोठी गर्दी होते. आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()