Child Trafficking : मुलांच्या तस्करीचा प्रयत्न उधळला; बिहारमधील ५९ बालकांची सुटका; ५ अटकेत

रेल्वे पोलिसांची कारवाई; पाच जणांना अटक
child trafficking railway police action crime smuggle children from Bihar into Maharashtra
child trafficking railway police action crime smuggle children from Bihar into Maharashtra sakal
Updated on

मनमाड : बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या  तस्करीचे प्रयत्न रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हाणून पाडला. दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळ येथे २९ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ३० अशा ५९ बालकांची बुधवारी सुखरूप सुटका करण्यात आली असून पाच जणांना अटक केली आहे.

सांगली येथील मदारशात या मुलांना शिक्षणाच्या नावाखाली नेत तस्करी करीत असल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून मुलांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाईला केली. दानापूर एक्स्प्रेस ही गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर या गाडीची दोन्ही दलांच्या पथकाने कसून तपासणी केली.

यावेळी गाडीतील वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५  वयोगटातील २९ लहान बालके आढळली. त्यांना पथकाने ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला पकडण्यात आले. त्या सर्वांना रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले. 

गाडीत अजूनही मुले असावीत, असा संशय आल्यानंतर भुसावळहून मनमाडकडे जाणाऱ्या दानापूर-पुणे एक्स्प्रेसची तपासणी करत शोध मोहीम राबवली. वेगवेगळ्या डब्यात बसलेली काही मुलांबद्दल संशय आल्यानंतर या पथकाने ३० लहान मुले आणि त्यांची तस्करी करणारे चार संशयितांना मनमाड रेल्वे स्थानकात ताब्यात घेतले.

child trafficking railway police action crime smuggle children from Bihar into Maharashtra
Police Department Information : आधुनिक, तांत्रिक कार्यपद्धतींचा वापर पोलिस दलासाठी आवश्यक

या मुलांची मदरशातील शिक्षणाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. पालकांचे कुठलेही संमतीपत्र त्यांच्याकडे नव्हते किंवा कोणत्या शाळेत, मदरशात दाखल करणार याची कुठलीही कागदपत्रे नसल्याने संशय अधिक बळावला.

या मुलांची आणि संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर एका संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि चार संशयित तस्करांविरुद्ध मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकात मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

child trafficking railway police action crime smuggle children from Bihar into Maharashtra
Pune Traffic Police : नो पार्किंगमध्ये वाहन लावताना जरा जपूनच; दंडाची रक्कम डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच स्वीकारणार

मुले बालसुधारगृहात दाखल

ताब्यात घेतलेल्या मुलांजवळ ओळख पटणारी कुठलीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्या पालकांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.सुटका केलेल्या ५९ मुलांपैकी २९ मुलांना जळगाव आणि ३० मुलांना नाशिक येथील  बालसुधारगृहात दाखल केले आहे. या मुलांची तस्करी करणाऱ्या चार व्यक्तींना चांदवड न्यायालयापुढे हजर केले असता १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.