धक्कादायक! 9-13 वर्षे वयोगटातील मुलं दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ इंटरनेटवर घालवतात

9 ते 13 वर्ष वयोगटातील मुलं सोशल मीडियावर तीन तासापेक्षा जास्त वेळ घालवत असल्याची माहिती महाराष्ट्रात केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
survey report
survey reportsakal
Updated on

9 ते 13 वर्ष वयोगटातील मुलं सोशल मीडियावर तीन तासापेक्षा जास्त वेळ घालवत असल्याची माहिती महाराष्ट्रात केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

हे सर्वेक्षण लोकल सर्कल,एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित करण्यात आले होते, या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील तब्बल 13,000 पालकांचा सहभाग घेतला होता. त्यांनी कोरोना नंतर इंटरनेटवरील सोशल मीडिया वापरणे आणि मुलांच्या व्हिडीओ गेम खेळण्याच्या सवयीवरुन या सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. (Children aged 9-13 years spending more than three hours a day on social media internet)

कोरानाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये,अनेक मुले शाळा बंद असल्याने घरीच होती. ऑनलाइन क्लासेस करताना याव्यतिरिक्त व्हिडिओ पाहणे, व्हिडीओ कॉल करणे, गुगल सर्चिंग करणे, ऑनलाइन व्हिडीओ गेम खेळणे यासाठी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप सारख्या गॅझेटचा वापर करत होती. आणि याच काळात मुलांना स्क्रीन-टाइमवर जास्त वेळ घालवण्याची सवय झाली.

survey report
Survey : धक्कादायक! चालू विमानात 66 टक्के पायलट झोपतात

कोरोना काळात मुले ऑनलाइन असायचे. त्यामुळे सोशल मीडिया, व्हिडिओ गेम हे इंटरनेटचे व्यसन होण्यामागे प्रमुख कारणे आहेत. या सर्वेदरम्यान 39 टक्के पालकांना त 9-13 वर्षे वयोगटातील मुलांना इंटरनेटचे व्यसन असल्याचे वाटते तर 35 टक्के पालकांना काही प्रमाणात खरे वाटते.

survey report
Madrasa Survey : CM धामींचं योगींच्या पावलावर पाऊल; यूपीनंतर आता उत्तराखंडमध्येही होणार मदरशांचं सर्वेक्षण

विशेष म्हणजे शहरी भागातील पालक त्यांच्या 9-13 वर्षांच्या मुलांना फेसबुक आणि इंस्टाग्रामसह सोशल मीडिया वापरण्याची परवानगी दिली आहे आणि या सर्वेक्षणात 47 टक्के शहरी पालकांनीसुद्धा सांगितले आहे की त्यांची 9-13 वर्षे वयोगटातील मुलांना इंटरनेटवर सोशल मीडिया, व्हिडिओ गेमचे व्यसन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.