Chinmay Bhandari Post: माधव भंडारींना भाजपनं कायम डावललं! मुलगा चिन्मयनं सोशल मीडिया पोस्टद्वारे मांडली खदखद

12 वेळा उमेदवारीसाठी नाव चर्चेत आलं पण पुढे त्यांचा कधीही विचार केला गेला नाही.
Madhav Bhandari
Madhav Bhandari
Updated on

Chinmay Bhandari Post : भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे नुकतीच जाहीर केली. उमेदवारीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचेही नाव चर्चेत होते. यापूर्वीही अनेक वेळा त्यांचे नाव उमेदवारीसाठी विचारात घेण्यात आले होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नव्हती. या वेळीही तसेच झाल्याने त्यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पत्र लिहीत खंत व्यक्त केली आहे. (chinmay bhandari x post says madhav bhandari has been sideline by BJP forever)

Madhav Bhandari
Manipur Violence: मणिपूरमध्ये 400 जणांनी पेटवलं पोलीस अधीक्षकांचं कार्यालय; हल्लेखोरांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश

चिन्मय भांडारींनी म्हटलं, "मी व्यक्त करत असलेलं हे मत माझ्या वैयक्तिक विचार प्रक्रियेतून तयार झालं आहे. भाजपची स्थापना होण्याच्या पाच वर्षे आधी १९७५ मध्ये माझे वडील जनसंघाशी जोडले गेले, त्याला आता जवळपास ५० वर्षे होत आली आहेत. भाजपचा एक आक्रमक प्रवक्ता आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २००८ ते २०१४ या काळात असलेल्या सरकारविरोधातील एक प्रमुख आवाज म्हणून अनेक जण त्यांना ओळखतात. मात्र, त्यांचे काम यापेक्षाही बरेच मोठे आहे. (Latest Maharashtra News)

या पन्नास वर्षांच्या काळात संघटनेला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात त्यांनी विविध भूमिका निभावत बरेच काम केले. त्यांनी हजारो लोकांना आणि शेकडो गावांना मदत केली. त्यांच्यामुळे लाखो जणांवर सकारात्मक बदल झाला आहे. सत्तेच्या गैरवापराविरोधात आणि सामान्य लोकांचे प्रश्‍न सर्वांसमोर मांडण्यात ते आघाडीवर असतात. पक्षाची धोरणे ठरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि २०१४ नंतर पक्षासमोर आणि सरकारसमोर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांची मोठी मदत झाली आहे.

Madhav Bhandari
Naresh Goyal: जेट एरवेजचे सर्वेसर्वा नरेश गोयल कॅन्सरनं त्रस्त; जामीनासाठी विशेष न्यायालयाकडे घेतली धाव

हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या कामाचा कधीही गवगवा केला नाही. आपल्या पदाचा त्यांनी कधीही गैरवापर केला नाही आणि वैयक्तिक लाभ घेतला नाही. त्यांनी कायम पक्षाला आणि जनतेला स्वत:पेक्षा अधिक प्राधान्य दिले. त्यामुळेच राज्यातील ते एक आदरणीय राजकीय व्यक्ती आहेत. असे असतानाही, आपल्या कामाचे फळ न मिळालेल्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. (Marathi Tajya Batmya)

मला आठवते तसे, किमान १२ वेळा तरी त्यांचे नाव विधानसभेसाठी किंवा राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते आणि बाराही वेळा त्यांना संधी मिळाली नाही. माझा नेतृत्वावर आक्षेप नाही, कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्या नेतृत्वावर विश्‍वास आहे. पण तरीही आशा आणि दु:ख व्यक्त करण्याची माझी हीच जागा आहे.

Madhav Bhandari
Manipur Violence: मणिपूरमध्ये 400 जणांनी पेटवलं पोलीस अधीक्षकांचं कार्यालय; हल्लेखोरांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश

माझ्या वडिलांनी जाहीरपणे कधीही नाराजी व्यक्त केली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी त्यांचे आयुष्य खर्च केले, त्या पक्षाला त्यांनी दुखावण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. पक्षासाठी काम करणे त्यांनी कधीही थांबविले नाही. उलट अनेकदा संधी मिळालेले नेते केवळ एकदा नाव वगळले म्हणून ‘अन्याय’ झाल्याची ओरड करताना आपण पाहिले आहेत. मला माझ्या वडिलांच्या कामाचा प्रचंड अभिमान वाटतो. आता हा अखेरचा टप्पा आहे. (Latest Marathi News)

Madhav Bhandari
Ind vs Eng Sarfaraz Khan : सर्फराज खानच्या जर्सीचा क्रमांक का आहे 97? वडिलांनी सकाळशी बोललाना केला खुलासा

ज्या व्यक्तीची खरोखरीच पात्रता आहे, त्याला योग्य ते फळ मिळेल, अशी मला आशा आहे. इतरही अनेक निस्वार्थीपणे काम करणारे लोक आहेत, त्यांच्याबद्दलही मला असेच वाटते. मी अनेक वर्षांपासून वडिलांना काम करताना पाहत आहे, त्यामुळेच आज व्यक्त व्हावेसे वाटले. कोणताही अपेक्षाभंग माझ्या वडिलांना धक्का देऊ शकत नाही, हे मला माहीत आहे. ते यापुढेही देशासाठी, पक्षासाठी काम करतच राहतील, याची मला खात्री आहे, असंही चिन्मय भांडारी यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()