Chiplun Flood Update : चिपळूणात पूरस्थिती; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, दिले 'हे' स्पष्ट आदेश

पावसाचा जोर वाढल्यामुळं वाशिष्ठी नदीच्या (Vashishti River) पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे.
Chiplun rain Update Ajit Pawar
Chiplun rain Update Ajit Pawaresakal
Updated on
Summary

हवामान खात्यानंही येत्या चार दिवसांत कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई : कोकणातील चिपळूण (Chiplun Konkan) आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळं वाशिष्ठी नदीच्या (Vashishti River) पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्यानं धोका पातळी गाठली आहे.

चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

Chiplun rain Update Ajit Pawar
Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्यानं येत्या चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, मदतकार्य तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम हे देखील उपस्थित होते.

Chiplun rain Update Ajit Pawar
Thane Rain Update : उल्हास, काळू नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ; 'या' नदीनं गाठली धोका पातळी, गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यात पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे. हवामान खात्यानंही येत्या चार दिवसांत कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. तसंच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे.

वाशिष्ठीचे पाणी धोका पातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसंच पुरामुळं बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीनं पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.

Chiplun rain Update Ajit Pawar
Ratnagiri Rain Update : महाबळेश्‍वरच्या पावसामुळं 'जगबुडी'नं गाठली इशारा पातळी; किनारपट्टी भागात समुद्रही खवळला

दोन वर्षांपूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळं चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहितीसुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.