पुन्हा माझ्या नादी लागू नका, तोंडावर आपटाल; चित्रा वाघ यांचा इशारा

बाकी सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का?, वाघ यांचा खोचक सवाल
chitra wagh criticized to vidya chavan
chitra wagh criticized to vidya chavan
Updated on
Summary

बाकी सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का?, वाघ यांचा खोचक सवाल

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. सत्ताबदलामुळे विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाणांवर टीकेची झोड उठवली आहे. पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असा इशाराही वाघ यांनी ट्वीट करत दिला आहे. (chitra wagh criticized to vidya chavan)

काय म्हणतात चित्रा वाघ ट्वीटमध्ये ?

फक्त नाव 'विद्या' असून विद्या येत नाही हो.. सोलापूर प्रकरणात ना पिडीतेली भेटलो ना आजपर्यंत तिला पाहिलं पण तुम्हाला मात्र जीभ उचलली की टाळ्याला लावण्याची घाईचं फार असते. बाकी सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का?, त्यामुळं पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असा धमकी वजा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीच्या चव्हाण यांना दिला आहे.

chitra wagh criticized to vidya chavan
Yogi Govt UP : योगी सरकारमध्ये नाराजीनाट्य, 2 बडे नेते शहांकडे करणार तक्रार

काय आहे नेमक प्रकरण ?

विद्या चव्हाण यांची सुन गौरीने चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात छळाची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांवर गुन्हाही दाखल केला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आपली बाजू मांडताना विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. विद्या चव्हाण यांच्या आरोपांना गौरीनं उत्तर दिलं होतं. घरात छळ होत असल्यामुळं मी पोलिसांकडं तक्रार केली, तेव्हाच माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करून बदनामीची धमकी चव्हाण कुटुंबानं दिली होती. त्यानुसार आता सगळं केलं जात आहे. मला मुलगा झाला नाही म्हणून माझा छळ व्हायचा. माझ्या दीरानंही माझा मानसिक छळ केला. मात्र, मी गप्प बसणार नाही हे लक्षात येताच त्यांनी मला घराबाहेर काढलं. माझ्या लहान मुलीला माझ्यापासून वेगळं केलं, असं तिनं सांगितलं होतं.

काय आहे सोलापूर पीडितेचे प्रकरण?

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिडीत तरुणीच्या पाठी मागे उभ्या राहल्या होत्या. मात्र याप्रकरणात पिडीत तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते. पीडितेसोबत वाघ यांची १८ फेब्रुवारीला भेट झाली त्यानंतर तीने २०१७ पासूनची घटना सांगितली होती. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केला आणि जबरदस्ती तिचा गर्भपात केला. तो सुद्धा चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन करण्यात आला आहे, अशी माहिती त्या पीडितेने वाघ यांना दिली होती.

chitra wagh criticized to vidya chavan
Lok Sabha : घोषणाबाजी करणाऱ्यांनी चर्चेत सहभाग घ्यावा, लोकसभेचं कामकाज ठप्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.