अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा धुर काढलाय

आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय ते, चित्रा वाघ यांनी फटकारलं
chitra Wagh latest news
chitra Wagh latest news
Updated on
Summary

आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय ते, चित्रा वाघ यांनी फटकारलं

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राजकारातील घडोमोडींना वेग आला आहे. नेत्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरु आहेत. यादरम्यान होणाऱ्या सभा, भेटी यांमुळे निवडणुकीला आणखी रंगत चढणार असल्याचे संकेत आहेत. राज्यकर्ते दावे-प्रतिदावे आणि अरोपप्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशीच एक टीका महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. आता या वक्तव्याचा भाजपाच्या चित्रा वाघ यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. (chitra Wagh latest news)

'अकेला देवेंद्र क्या करेगा,' अशी टीका करत महाविकास आघाडीने भाजपाला डिवचले होते. यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद असताना 'अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणताय! आरे, एकट्यानेच तुमच्या तिघांचाही धुर काढलाय, आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय, असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

chitra Wagh latest news
'नेहरूंना EDची नोटीस पाठवल्याशिवाय यांचा आत्मा शांत होणार नाही'

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महिला मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं. त्या म्हणाल्या की, राज्यसभेच्या दोन जागा तर येणारच मात्र तिसरी जागाही निवडुन येणार आहे. राज्यात सरकारी दवाखान्यात सामान्य नागरीक जाण्यासाठी घाबरत आहे. राज्यातील मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाही तर गोरगरीबांनी सा विश्वास ठेवायचा?, असा सवालही त्यांनी उपस्थित करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पहाणाऱ्यांचा चिमटा काढताना वाघ म्हणाल्या, पुढचा मुख्यमंत्री आमचाच म्हणणाऱ्या राज्यातील तीन पक्षांच्या आघाडीची गोडी कडू झाली आहे. मात्र, सत्तेसाठी आणि भाजपाला दुर ठेवण्यासाठी ही गोडी घेत आहेत. राज्यात एवढं गंभीर प्रश्न असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची स्वप्न पडतात, हि बाब दुदैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे.

chitra Wagh latest news
आम्हाला कुणीही अडवू शकत नाही, राज ठाकरेंचा कार्यकर्ता पोहचला अयोध्येत

आता त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे पाहवे लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला रंगत चढली असताना आता सत्ताधारी गटातील नेते यावर काय वक्तव्य करतात याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()