दिवसांतून या ३ सरकारचे ३ मंत्री येऊन सरकार खंबीर आहे हे चेक करून जातात
पुणे - पुणे ही सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. रोज इथल्या मुलींना त्रास दिला जात आहे. या गोष्टींचे रोज नवे उच्चांक होत आहेत. शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत. पोलिस यंत्रणा यासमोर हतबल झाली आहे. पुणे अत्याचाराचे माहेर घर आहे का ? असा सवाल भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला आहे. आज त्या पुणे येथे बोलत होत्या. राज्यसरकार हे जुगाडू आणि तडजोडीचे सरकार असल्याने कायदा, सुव्यवस्थेचे वाईट हाल सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे.
ते म्हणाले, महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. राज्यात एकही जिल्हा असा नाही की, जिथे महिलांवर अत्याचार झाले नाहीत. राज्यात कायदा आणि सव्यवस्थेचे लतकरं टांगली असल्याचे चित्र आहे. सरकारमधील मंत्र्यांचे हाथ बरबटलेले आहेत. संजय राठोड यांची हकालपट्टी झाली, मात्र त्यांच्यावर शून्य कारवाई झाली. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर FIR दाखल करणार का? असा सवाल त्यांनी पुणे पोलिसांना विचारला आहे.
सरकारची भूमिका ढीम्म आहे. या सरकार ने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान केलं आहे. आरोग्य विभाग परीक्षेची परिस्थितीही तशीच आहे. नगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत जर डॉक्टर्स आणि नर्स आरोपी दाखवले आहे, तर आरोग्यमंत्रीही दोषी आहेत. सरकारने किती शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट केले आहे हे स्पष्ट करावे असेही त्या म्हणाल्या.
राज्यतील एसटी संपाबाबत त्या म्हणाल्या, वचननामे काढा. या लोकांचे manifesto बघा. १४ दिवस झाले हे कर्मचारी लहान मुलांना घेऊन आंदोलनाला बसले आहेत. हे सरकार लोकधारजिन नाही. आमच्या सरकारला धोका नाही असे एक सर्वज्ञानी रोज सकाळी येऊन सांगतात असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी खासदार संजय राऊत यांना सवला आहे. दिवसांतून या ३ सरकारचे ३ मंत्री येऊन सरकार खंबीर आहे हे चेक करून जातात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. त्या म्हणाल्या, माझी कुटुंब माझी जबाबदारी सांगणाऱ्या मुख्यमंत्रीजी तुमच्या नकाखाली रोज घटना घडत आहेत. तुम्ही काय केले? conviction रेट १३.७ आहेत उत्तर प्रदेशचा ५५ आहे. त्यासाठी तुम्ही काय करत आहात? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार मिस्टर नटवरलालचं आहे. परमबीर सिंग तुमच्या नाकाखाली होते. तुम्ही काय अॅक्शन घेतली? केंद्र सरकारकडे बोट दाखवणं यांचा रोजचा कार्यक्रम आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.