‘किशोरी पेंग्वीनकर ताईंचा चांगलाच भडका उडालाय..!’

By the way: पेंग्विनला मराठमोळं ‘पेग्विनकर’ हे नाव कसं वाटतंय?
Criticism between Kishori Pendekar and Chitra Wagh
Criticism between Kishori Pendekar and Chitra WaghCriticism between Kishori Pendekar and Chitra Wagh
Updated on

मुंबई : मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिलांचे आणि वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्यात आले. यापुढे हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाच्या पिल्लाचं ‘चिवा’ असे नाव ठेवू, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लगावला. यानंतर ऑस्कर नावावरून मिरची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी ‘पेंग्वीनकर’ ताईंचा चांगलाच भडका उडालाय, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली. (Criticism between Kishori Pendekar and Chitra Wagh)

मुंबईतील (Mumbai) भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या दोन पिल्लांची आणि वाघाच्या बछड्याचं अखेर बारसं झाले. या पेंग्विनच्या पिल्लांची नाव काय असतील याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. ‘ऑस्कर’ आणि ‘ओरिओ’ अशी नाव त्यांना देण्यात आली आहे. करिष्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीने जन्म दिलेल्या मादी जातीच्या बछड्याचे नाव ‘वीरा’ ठेवले आहे.

Criticism between Kishori Pendekar and Chitra Wagh
पोलिस निरीक्षक कॉन्स्टेबलला म्हणाला; मला तू खूप आवडते, फक्त...

पेग्वीनच्या पिलाचे नाव ‘ऑस्कर’ ठेवल्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले. ‘तुम्ही सांगत आहात की, नाव मराठीत ठेवा तर यापुढे हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाच्या पिल्लाचं ‘चिवा’ असे नाव ठेवू, असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pendekar) लगावला होता.

आम्ही सामान्य जनतेसाठी कामे करीत आहो. परंतु, ही काम न पाहता फक्त विरोधाला विरोध म्हणून खालच्या पातळीवरील टीका करणे योग्य नाही. आम्ही वाघिनीच्या बछड्याचे नाव ‘विरा’ ठेवले आहे. हे नाव मराठीतच आहे. प्राण्यांची नावे मराठीत ठेवण्याची भाजपची मागणी असेल तर यापुढे हत्तीच्या पिल्लाचे ‘चंपा’ असे नाव ठेवू आणि माकडाच्या पिल्लाचं ‘चिवा’ ठेवू, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लगावला होता.

Criticism between Kishori Pendekar and Chitra Wagh
Punjab Elections : अकाली आमदारांच्या निवडणूक सभेत गोळीबार

याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत ‘ॲास्कर’ नावावरून मिरची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी ‘पेंग्वीनकर’ ताईंचा चांगलाच भडका उडालाय! By the way: पेंग्विनला मराठमोळं ‘पेग्विनकर’ हे नाव कसं वाटतंय? त्याला आपण प्राणीसंग्रहालयाचा महापौरही बनवुया! असा टोला हाणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.