Chitra Wagh: ''...नाहीतर शरद पवारांना त्रास होईल'', विद्या चव्हाणांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणानंतर चित्रा वाघ यांचा थेट इशारा

Sharad Pawar: ''आम्ही तर देशमुखांच्या पेन ड्राईव्हची वाट बघत होतो.. तीन तासांमध्ये तुमची ऑडिओ क्लिप व्हायरल करु, इथून सुरुवात झाली होती. विद्या चव्हाण यांच्या सुनेच्या प्रकरणात एका फॅमिली डॉक्टरने मला सांगितले होते की, एका महिलेला मदत करायची आहे. मी त्या क्लिनिकमध्ये गेली होती, तिकडे यांची सुन होती. त्या पेन ड्राईव्हवाल्या ताईंना पहिला मुलगा हवा होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुनेचा छळ सुरु केला. त्या सुनेने आणि त्यांच्या वडिलांनी मला सर्व सांगितले. मारहाण वैगरे होत होती.''
chitra wagh vidya chavan
chitra wagh vidya chavanesakal
Updated on

Vidya Chavan: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांनीच माझ्या सुनेला भडकावून माझ्याविरोधात आरोप करायला लावले; असा घणाघात केला. त्यासाठी त्यांनी पुरावा म्हणून एका पेन ड्राईव्हमधील ऑडिओ क्लिप ऐकवली.

विद्या चव्हाण यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, मी पवार साहेबांना काय म्हटले? त्यांच्या मोठ्या ताईंना काय म्हटले? पवार साहेबांसोबत माझं बोलणंदेखील नाही. विद्या चव्हाण यांच्या सुनेच्या छळासंबंधीचे ते संभाषण विधानसभेच्या पटलावर फडणवीसांनी मांडलं आहे. ताई हाऊसमध्ये नसल्यामुळे त्यांनी ते ऐकले नसेल.

''त्यांच्या पक्षासाठी २० वर्षात पायाचे कातडेसुद्धा काढून दिले. जी जबाबदारी पक्षाने दिली ती पार पाडण्यासाठी कष्ट घेतले.. चित्रा वाघमध्ये क्वालिटी होती म्हणून पक्षाने काही जबाबदारी दिली. आम्ही कधीच कसली अपेक्षा केली नाही. महिला आयोगाचं सदस्यपद मला पक्षाने नक्की दिले, पण माझ्यासोबत तुम्ही काय काय केलं? मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका.. नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल.'' असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

chitra wagh vidya chavan
Vidya Chavan on Chitra Wagh: "माझ्या सुनेच्या प्रकरणाला दिलं वेगळं वळण..!" विद्या चव्हाणांनी ऐकवला चित्रा वाघ यांचा ऑडिओ, फडणविसांवर केले मोठे आरोप

वाघ पुढे म्हणाल्या की, आम्ही तर देशमुखांच्या पेन ड्राईव्हची वाट बघत होतो.. तीन तासांमध्ये तुमची ऑडिओ क्लिप व्हायरल करु, इथून सुरुवात झाली होती. विद्या चव्हाण यांच्या सुनेच्या प्रकरणात एका फॅमिली डॉक्टरने मला सांगितले होते की, एका महिलेला मदत करायची आहे. मी त्या क्लिनिकमध्ये गेली होती, तिकडे यांची सुन होती. त्या पेन ड्राईव्हवाल्या ताईंना पहिला मुलगा हवा होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुनेचा छळ सुरु केला. त्या सुनेने आणि त्यांच्या वडिलांनी मला सर्व सांगितले. मारहाण वैगरे होत होती.

चित्रा वाघ यांनी सांगितलं की, चव्हाण यांच्या धाकट्या मुलाने त्या मुलीचा विनयभंग केला होता. त्यावर चव्हाण म्हणताय की घरात ह्या गोष्टी होत राहतात.. हे बाहेर जाता कामा नये. गौरीची सासूबाई कोणी साधी बाई नव्हती ती एक आमदार होती. म्हणून पोलिस मदत करु शकले नाहीत. त्यांनी मुलीला धमकी दिली.. त्यामुळे ती बिचारी ती पवार साहेबांकडे गेली.. महाराष्ट्राचे जाणते राजे.. ती मुलगी पवार साहेबांकडे गेली पण तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

  • विद्या चव्हाण यांना लाज वाटायला पाहिजे

  • हो मी तिला (गौरी) मदत केली

  • विद्या चव्हाण, मी आनंदी आहे. कारण तू सगळ्या केस हारलीस

  • केलं तिला गाईड मी माझं काय चुकलं? मी पण आई आहे.. बाईची व्यथा समजते

  • आई आणि मुलाची ताटातूट केलीस आणि आज ते लेकरु आईच्या कुशीत आहे

  • एखाद्या बाईवर अन्याय होत असेल तर तेवढे सहकार्य मी करणार

  • पेन ड्राईव्हची पुंगळी कर आणि कुठे ठेवायचं आहे ते ठेव. पुन्हा असे फुसके बार सोडू नको

  • मी जे केलं त्याचा मला अभिमान आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.