"रोहित, आज आबांनाही तुझा अभिमान वाटला असता"; चित्रा वाघ भावूक

रोहित पाटील यांनी कवठेमंहाकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली आहे.
Chitra Wagh_Rohit Patil
Chitra Wagh_Rohit Patil
Updated on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (R. R. Patil) यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांनी नगरपंचायत निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळं भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रोहितचं यश हे पक्षाच्या पलिकडं जाऊन पाहिलं पाहिजे, असं वाघ यांनी म्हटलं आहे. (Chitra Wagh praises Rohit Patil success)

वाघ म्हणाल्या, "ज्यावेळी आबांचं आजारपण सुरु होतं तेव्हा रोहित अगदीच लहान होता. त्यावेळी वडिलांसाठीची त्याची तगमग मी पाहिली होती. पण आज तो खरंच आबांच्या पावलावर पाऊल टाकून चालताना मला मनापासून आनंद झाला. त्यामुळं त्यानं जी मेहनत घेतली, त्याचचं हे फळ आहे. तो नववी-दहावीला असेल तेव्हापासूनच राजकारणात त्याचा रस होता त्यामुळं त्याला आज हे यश मिळालं आहे, त्यामुळं ते पाहुन मला खरंच आनंद झाला"

Chitra Wagh_Rohit Patil
सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

कुठलंही पद असू किंवा नसू रोहित आबांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालला आहे. सर्वसामान्यांशी नाळ असलेला नेता म्हणून आम्ही आर. आर. पाटलांकडे पाहतो. त्यांच्यासोबत मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, त्यामुळं त्यांच्याप्रती कायमचं आदर आहे. आज आबा हयात नाहीत पण ते असते तर त्यांना निश्चितच रोहितचा हा विजय पाहून आनंद झाला असता, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी आर. आर. पाटलांच्या आठवणींना उजाळाही दिला.

Chitra Wagh_Rohit Patil
राज्याला दिलासा! दोन आठवड्यात ठरणार OBC आरक्षणाचं भवितव्य

राजकारण म्हटलं की, संघर्ष हा आलाच. त्यामुळं हे चागलंच आहे की संघर्षातून त्याची सुरुवात झाली. कारण येणारी जी पाऊलवाट आहे, ती संघर्षातून त्यानं निर्माण केली आहे. त्यामुळं येणारा त्याचा पुढचा काळ हा निश्चितच उज्वल असा असेल. मी त्याची अनेक भाषण ऐकली त्यामध्ये तो सर्वसामान्यांशी जोडलेला दिसतो, अशा शब्दांत त्यांनी रोहितचं कौतुक केलं आहे.

रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीनं १० जागा मिळवल्या आहेत. तर शेतकरी पॅनलला ६ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराला विजय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.