Chitra Wagh : संजय राऊतांमुळे उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालं; चित्रा वाघ यांची टीका

Chitra Wagh on ED Action Sanjay Raut
Chitra Wagh on ED Action Sanjay Rautesakal
Updated on

मुंबई - उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजप यांच्यातील सातत्याने शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याला आज भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Chitra Wagh on ED Action Sanjay Raut
Ajit Pawar : भाजपला शिंदे-अजित दादासारखे मिळाल्याने आमची गरज संपली; जानकरांचं विधान

चित्रा वाघ म्हणाल्या की, सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमचं अजिबात मातेरं झालेलं नाही. उलट, तुमच्या संगतीने उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालेलं आहे. मोठ्या भावाचं मोठेपण तुम्हाला खुपत होतं; घराचं घरपण आपल्याकडे न जाता मोठ्या भावाकडंच जाणार, या असूयेपोटी तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलात. योग्य वेळ येताच मोठ्या भावाने या दगाबाजीचं व्याजासहित उट्टं काढलं. तेव्हापासून हा एकेकाळचा धाकटा भाऊ भ्रमिष्टासारखा बडबडत असतो, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

Chitra Wagh on ED Action Sanjay Raut
Sharad Pawar: "गुजरात अन् 2, 3 छोट्या राज्यात भाजप, आता..."; शरद पवारांनी केली राजकीय भविष्यवाणी

दुसरीकडे मोठा भाऊ मात्र जमिनीवर घट्ट पाय रोवून कुटुंबाला आधार देत ठामपणे उभा आहे. ते आमचे देवेंद्रजी. देवेंद्रजींना खोटारडा म्हणणे म्हणजे काजव्याने सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे ही थुंकी तुमच्याच अंगावर पडणार आहे. तुम्ही तर या घाणीत अगोदरच पुरते बरबटलेले आहात संजय राऊत तुम्ही उद्धवसेनेचे आचारी बनला आहात.

दरम्यान आपल्या स्वत:च्या किचनला आग लागलेली असताना दुसऱ्याच्या जेवणाकडे शहाणा आचारी, लक्ष देत नसतो, असही चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()