CIBIL Scoreचे टेन्शन नाही! मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्जासाठी सीबीलची अट रद्द? नरेंद्र पाटलांनी काय सांगितले?

Maratha Youth Business Loan: मराठा समाजातील तरुणांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट शिथिल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
Maratha Youth Business Loan
Maratha Youth Business LoanEsakal
Updated on

मराठा समाजातील तरुणांना ८ हजार ६०० कोटी रुपये कर्ज वितरित करून उद्योग उभे करण्यासाठी मोठे सहकार्य करण्यात आले आहे. पुढील काळात मराठा समाजातील तरुणांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट शिथिल करणार आहे तसे प्रयत्न सुरू आहेत, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजातील उद्योजक लाभार्थी आणि इच्छुकांसाठी औसा शहरात गुरुवारी (ता. पाच) घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, सारथी उपजिल्हाधिकारी राहुल जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, की कर्ज वितरणानंतर ८५० कोटी रुपयांचे व्याज परत केले गेलेले आहे. त्यामुळे बँकांचा मराठा समाजावरचा विश्वास वाढला आहे. राज्यात १ लाख मराठा तरुण उद्योजक बनविण्याच्या संकल्पपूर्तीचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. आता औसा तालुक्यात दरवर्षी १ हजार मराठा तरुणांना उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमात यापूर्वी ६५० तरुणांना लाभ देण्यात आले आहे.

Maratha Youth Business Loan
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर टेन्शन नको! आता थेट साडेचार हजार येणार खात्यात, शिंदे भाऊंनी दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महामंडळाला स्वायत्तता मिळाली, तरुण उद्योजकांना मदत मिळाली, असे नमूद करीत महायुतीच्या सरकारचे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम सुरू असल्याचेही सांगितले.

पाटील यांनी भाषणात काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. आर्थिक महामंडळाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी तहसील कार्यालयात ते एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे आश्वासन दिले. आमदार पवार यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज वितरणात चालढकल होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानी बँकांना गरजू लाभार्थीची अडवणूक टाळण्यासाठी कामात सुलभता आणण्याची गरज असल्याचे नमूद केले.

Maratha Youth Business Loan
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; 'या' ठिकाणी घेतली बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.