Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CID करणार; आजच सूत्र हाती घेणार

Mumbai Crime News: बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेंच्या कोर्टासमोर सुनावण्या सुरु होत्या. सोमवारी त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालेलं आहे
Akshay Shinde
Akshay ShindeESakal
Updated on

Badlapur School Crime: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे एन्काऊंटरचा तपास सीयायडी करणार आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला असून सीआयडी अधीक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक मंगळवारी ठाण्यात दाखल होणार असून तपासाला सुरुवात करणार आहे.

बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेंच्या कोर्टासमोर सुनावण्या सुरु होत्या. सोमवारी त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. सुरुवातीला त्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालेलं आहे

Akshay Shinde
Edible Oil Price Hike : तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ; नवरात्रोत्सव, दिवाळीतही तेजीचा अंदाज

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरोपीच्या पूर्व पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यामुळे चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला नेलं जात होतं. त्याचवेळी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि हवेमध्ये फायरिंग केलं. अक्षयने बंदुकीतून फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.