इयत्ता दहावीचा आज निकाल! विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळावरून पाहाता येणार घरबसल्या निकाल; विद्यार्थ्यांनी ‘हे’ आवर्जुन लक्षात ठेवावे

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धतीने निकाल असणार आहे. निकाल पाहण्यासाठी बोर्डाने विविध संकेतस्थळे उपलब्ध करून दिली असून त्यावर घरबसल्या निकाल पाहाता येणार आहे.
solapur
दहावीचा निकालsakal
Updated on

सोलापूर : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या (सोमवारी) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धतीने हा निकाल असणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाने विविध संकेतस्थळे उपलब्ध करून दिली असून त्यावर घरबसल्या निकाल पाहाता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, इयत्ता बारावीच्या निकालानंतर मे महिन्यातच दहावीचाही निकाल जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पहिल्यांदाच दोन्ही निकाल मे महिन्यात जाहीर केले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांच्या नेतृत्वात यंदा दोन्ही वर्गाचे निकाल कमी वेळेत जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची पुढील प्रवेश प्रक्रिया देखील वेळेत सुरू होण्यास मदत होणार आहे. इयत्ता दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी शाळांनी https://mahahsccboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे बोर्डाने कळविले आहे. यंदा परीक्षेत सरमिसळ पद्धतीचा अवलंब केल्याने विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी कमी असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कला शाखेत अकरावीला प्रवेश घेता येणार आहे, मात्र त्यांना जुलैमधील पुरवणी परीक्षा व मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण व्हावेच लागेल.

‘या’ संकेतस्थळावरून पाहा दहावीचा निकाल

  • mahresult.nic.in.

  • sscresult.mkcl.org

  • sscresult.mahahsscboard.in

  • results.digitallocker.gov.in

  • results.targetpublications.org

विद्यार्थ्यांनी ‘हे’ आवर्जुन लक्षात ठेवावे...

  • गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे २८ मे ते ११ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील

  • विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत किंवा थेट https://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून करावेत अर्ज

  • पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पहिली उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी, त्यानंतर कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा

  • सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी तथा गुणसुधार योजनेअंतर्गत असतील. त्यात जुलै-ऑगस्टमधील पुरवणी परीक्षा व मार्चमधील परीक्षेचा समावेश आहे

  • श्रेणी किंवा गुणसुधार योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३१ मेपासून ऑनलाइन पद्धतीने बोर्डाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.