‘RTE’तून मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा! पालकांना ‘या’ संकेतस्थळावर समजेल यादी; 23 ते 31 जुलैपर्यंत तालुकास्तरावर कागदपत्रांची पडताळणी

‘आरटीई’तून प्रवेशासाठी ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज केला आहे, त्यांना उद्या (शनिवारी) https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर लॉटरीतून नंबर लागलेल्यांची यादी पाहता येणार आहे.
schools admission
schools admissionsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील २९१ खासगी इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये आता दोन हजार ४६४ विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. राज्य शासनाने पूर्वी काढलेला आदेश तथा बदल उच्च न्यायालयाने रद्द केल्याने अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या (घरापासून एक किमी अंतर) नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शालेय शिक्षण विभागाने पूर्वीच्या ‘आरटीई’च्या प्रवेश नियमांमध्ये बदल करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित शाळांचा पर्याय दिला होता. या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून एक किमी अंतरात स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा खासगी अनुदानित शाळा नाही, त्यांनाच इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये प्रवेश घेता येणार होता. पण, या बदलाला काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याठिकाणी अंतरिम स्थगिती मिळाल्यावर शालेय शिक्षण विभागाने तो बदल तात्पुरता थांबवून पालकांकडून दुसऱ्यांना अर्ज भरून घेतले. त्यानंतर ७ जुलैला प्रवेशाची सोडत तथा लॉटरी देखील निघाली, मात्र न्यायालयाच्या अंतिम निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे सरकली नव्हती.

आता उच्च न्यायालयाने तो बदल रद्द ठरविल्याने विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळणार आहेत. त्यानुसार आता प्रवेश मिळालेल्यांची व प्रतिक्षा यादी २० जुलैला जाहीर होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० हजार पालकांनी अर्ज केले असून त्यातील दोन हजार ४६४ विद्यार्थ्यांना ‘आरटीई’तून इयत्ता पहिलीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.

पालकांना ‘या’ संकेतस्थळावर समजेल यादी

‘आरटीई’तून प्रवेशासाठी ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज केला आहे, त्यांना उद्या (शनिवारी) https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर लॉटरीतून नंबर लागलेल्यांची यादी पाहता येणार आहे. तसेच प्रवेशासाठी निवड झालेल्यांना सोमवारी (ता. २२) एसएमएस येणार आहेत. त्या पालकांनी २३ ते ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()