Ajit Pawar : ''आम्हाला वाटलं श्रेय घ्यायची गरज आहे तर घेऊ'' कांद्यावरुन अजित पवार थेटच बोलले

sharad pawar ajit pawar devendra fadnavis
sharad pawar ajit pawar devendra fadnavis esakal
Updated on

मुंबईः केंद्र सरकारने आज कांदा खरेदीबाबत एक निर्णय घेऊन दोन लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करण्याच्या निर्णय घेतला. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर गोयल यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या भेटीपूर्वीच जपानला गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा केंद्रच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. त्यामुळे कांद्यावरुन श्रेयवाद सुरुय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

sharad pawar ajit pawar devendra fadnavis
ब्राह्मणांचा एवढा द्वेष तर फडणवीसांसोबत सत्तेत का? काकासाहेब कुलकर्णींचा भुजबळ यांना सवाल

पत्रकार परिषदेमध्ये श्रेयवादाचा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि आम्ही दोघेही सरकारचाच भाग आहोत. त्यामुळे त्यात अडचण काय?

पवार पुढे म्हणाले की, कांद्याबाबत श्रेयवादाची लढाई अजिबात सुरु नाही. टीका करणारे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत नाहीत. आम्ही श्रेयासाठी हापालेले नाहीत. तरीही आम्हांला वाटलं श्रेय घ्यायची गरज आहे तर घेऊ, अडचण काय आहे?

sharad pawar ajit pawar devendra fadnavis
Tukaram Mundhe : कामात दिरंगाई केल्याचा तुकाराम मुंढेंवर ठपका; नियमबाह्यपणे कंत्राट दिल्याचीही तक्रार, अडचणींमध्ये वाढ

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी होईल, असं म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय आपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.