राज्यात सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांना सामोरे जाणार आहे. ही निवडणूक इतरवेळांपेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सर्वोंचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाने नवा प्लॅन तयार केला असून तिहेरी रणनीती आखली असल्याचे समजते. (CM Eknath shinde and bjp Devendra Fadnavis makes a news plan for Mumbai BMC Elections Shivsena)
शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. सुरूवातील आमदार त्यानंतर खासदार आणि नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली.
दरम्यान, मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट नवनवीन रणनिती आखत आहेत. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार सज्ज झालं आहे.
कशापद्धतीची रणनीती?
निवडणुकीच बिगुल अद्याप वाजलेल नाही. मात्र, सर्व पक्ष राज्य दौरा करताना दिसत आहेत. परस्पर तयारीला सुरूवात केली आहे. दरम्यान, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप-शिंदे गटाने नवा प्लॅन आखला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये मराठी आणि प्रामुख्याने अमराठी मतांवर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. तर धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट एकिकडे भक्कमपणे कायदेशीर बाजू मांडेल. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना आपली असल्याचे पटवून देण्यासाठी शिंदे गट शर्तीचे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मनसेसोबतचा युती करण्याचा मोह भाजप आणि शिंदे गटाने टाळला आहे.
मुंबई निवडणुकीमध्ये महत्त्वाची मराठी मते आहेत. ती फोडण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार मनसेचा वापर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.