शिवसेनेत फुट पडल्यापासुन आणि दोन गट पडल्यापासुन ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिवसेना फुटीला वर्ष झालं आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झालेत. एक वर्षभरापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे ती थांबायचं नाव घेत नाही. आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. (Latest Marathi News)
४० आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे केवळ १५ आमदार होते. आता आणखी एका शिवसेनेच्या एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी काल रविवारी (१८ जून) रोजी शिंदे गटात प्रवेश केला आहे.(Latest Marathi News)
रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित होते. तर, रविवारी मनिषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
तर मनिषा कायंदे यांची शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनिषा कायंदे यांच्यासह चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांच्या पत्नीनेदेखील शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटवरून शेअर केली आहे.(Latest Marathi News)
मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.