Eknath Shinde: राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारणार! CM शिंदेंनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

CM eknath Shinde announcement for 51 theaters in the state prashant damle
CM eknath Shinde announcement for 51 theaters in the state prashant damle
Updated on

मुंबई: जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांचे रेकॉर्डब्रेक बारा हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावली. दरम्यान यावेळी बोलताना शिंदे यांनी राज्यातील नाट्यगृहांसाठी मोठी घोषणा केली आहे.

तुमच्या नाटकाचे रेकॉर्डब्रेक १२,५०० प्रयोग झाले तसा आम्ही देखील तीन-साडेतीन महिन्यापूर्वी एक महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. राज्यात देशात आणि जगभरात त्यावेळेस आम्ही प्रसिध्द झालो असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रशांत दामले यांना म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्याला केंद्राची देखील साथ असून पीएम मोदींनी देखील सव्वा दोनशे प्रकल्पांना दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे, अशी माहिती दिली. यासोबतच ठाणे- मुंबईत एक चित्रनगरी करायची असं ठरवलं असून, यामुळे एक व्यासपीठ उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान व्यासपीठावर बोलताना प्रशांत दामले यांनी निर्माते, कलाकर आणि प्रेक्षकांच्या वतीने राज्यातील चालू ५१ नाट्यागृहांची स्थिती लवकरत लवकर उत्तम करुन द्या, अशी थेट मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली, यावर बोलताना शिंदे यांनी नाट्यगृहांची दुरुस्ती तातडीने एक नोडल ऑफिसर नेमून त्यांच्याकडून राज्यातील सर्व नाट्यगृहांची पाहाणी केली जाईल. नाट्यगृहांच्या दुरुस्ती, डागडुजीसाठी गरजेचे असेल ते तातडीने पुरवले जाईल, हे शासनाच्या वतीने मी सांगतो, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

तसेच नाट्य कलाकारांना कोविड काळात देण्यात आलेल्या सवलती सरकार काढून घेणार नाही, तुमच्या अपेक्षा रास्त आहेत. आम्हाला सत्तेत येऊन तीन-साडेतीन महिनेच झाले आहेत थोडा वेळ द्या नक्कीच सगळं केलं जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.