Eknath Shinde: बहिणीनंतर लाडका भाऊ! 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6, तर पदवीधरांना 10 हजार मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath shinde big announcement for students: डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात आषाढी एकादशी दिनानिमित्त ही घोषणा केलीय.
Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

मुंबई- विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात आषाढी एकादशी दिनानिमित्त ही घोषणा केलीय.

राज्यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण, राज्यातील लाडक्या भावाचं काय असा प्रश्न विरोधक विचारत होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी मोठी घोषणा केली आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : ''बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्ता परिवर्तन करणारे शिंदे खरे राष्ट्रभक्त'', राजगुरु परमहंस आचार्यांची शंकराचार्यांवर टीका

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, १२ वी पास असणाऱ्याला ६ हजार, डिप्लोपा झालेल्याला ८ हजार तर पदवी केलेल्या तरुणाला १० हजार असं दर महिन्याला मिळणार आहेत. वर्षभर अप्रेन्टिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळतील. यानंतर त्याला कामाचा अनुभव मिळेल. या अनुभवाच्या जोरावर त्याला कुठेही नोकरी मिळेल.

कुशल कामगार तयार करण्यावर आमच्या सरकारचा भर आहे. आमच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात कुशल तरुणांची संख्या वाढेल. तरुण कुशल होतील. अप्रेन्टिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा स्टायपंड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. महायुती सरकार गरिबांचे आहे. लाडक्या बहीणसह, भाऊ देखील लाडके आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Eknath Shinde : चोखोबा स्मारकाचा 'तो' प्रश्न लवकरच मार्गी लावणार; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं शिष्टमंडळाला आश्वासन

इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या सरकारने अशाप्रकारची योजना आणलेली आहे. तरुण कारखान्यात काम करत असताना सरकार त्यांना अप्रेन्टिसशिपसाठी स्टायपंड देणार आहे. बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. विद्यार्थ्यांना पैस मिळतील आणि अप्रेन्टिसशिप करता येईल. यातून त्यांना अनुभव मिळेल. त्यामुळे यातून त्यांना नोकरी मिळण्यास सोपे जाईल, असंही शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.