'महाराष्ट्रातील शिवसैनिक आरपीआयमध्ये आले, तर मी त्यांचं टेबलावर उभं राहून स्वागत करेन.'
नवी दिल्ली : शिवसेनेच्या (Shiv Sena) 40 आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला पाठिंबा दिला. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावं लागलं. यानंतर 12 खासदारांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंना समर्थन दिलं. त्याचबरोबर आता सेनेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा शिंदे गटाला मिळताना दिसतोय.
दरम्यान, शिवसेनेकडून सेनेतल्या फुटीर आमदारांसमोर विलीनीकरण हाच पर्याय असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषदेत पुन्हा सांगितलं. तर, दुसरीकडं आरपीआयचे (RPI) अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर दिलीय. शिंदे गटानं आमच्या पक्षात विलीन व्हायचा निर्णय घेतल्यास स्वागत करु, असं त्यांनी म्हटलंय.
आठवले म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात येणार असतील तर मला आनंद होईल. मुख्यमंत्री, 50 आमदार, नगरसेवक आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक आरपीआयमध्ये आले तर मी त्यांचं टेबलावर उभं राहून स्वागत करेन, असं आरपीआयचे प्रमुख रामदास आठवलेंनी म्हटलंय. आठवले दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री आठवलेंनी नुकतीच नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. आरपीआय मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी आठवलेंनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.