Maratha Reservation : सरकार मराठ्यांचंच आहे, त्यामुळं मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला (Maratha Community) सोयीसुविधा देण्यास शासन कटिबद्ध असून, सरकार मराठ्यांचेच आहे.
CM Eknath Shinde Maratha Reservation
CM Eknath Shinde Maratha Reservationesakal
Updated on
Summary

मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्यासाठी विभागीय आयुक्त व इतर अधिकारी चर्चा करत असून, याबाबत त्यांनी योग्य भूमिका घ्यावी.

कास (सातारा) : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार सकारात्मक असून, जरांगे पाटलांनी आंदोलनाची भूमिका सोडून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा. सरकारला मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण द्यायचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुन्हा दरे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

CM Eknath Shinde Maratha Reservation
Mahabaleshwar : CM शिंदे रमले शेतीत! हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग; शिंदेंना का आहे इतकी शेतीची आवड?

शिंदे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला (Maratha Community) सोयीसुविधा देण्यास शासन कटिबद्ध असून, सरकार मराठ्यांचेच आहे, त्यामुळे मराठा समाजाने सहकार्याची भूमिका घ्यावी. मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्यासाठी विभागीय आयुक्त व इतर अधिकारी चर्चा करत असून, याबाबत त्यांनी योग्य भूमिका घ्यावी.’’

दरम्यान, उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त उत्तेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘उत्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासह सर्व सोयीसुविधांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. या भागातील सर्व विकासकामे आपण करत असून, तारांगण (तापोळा) ते उत्तेश्वर असा रोपवेही करणार आहे. गावागावांत जोडणारे रस्त्यांची कामे सुरू आहेत.

CM Eknath Shinde Maratha Reservation
Sugar Rate : साखरेचे दर 'इतक्या' रुपयांनी गडगडले; कारखानदार हवालदिल, FRP देण्यात येणार अडचणी

सत्तर वर्षांपूर्वीचा ऑफिसिएल सिक्रेट ॲक्ट आपण काढून टाकला असून, आता फक्त धरणापासून सात किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित आहे. वरचा सर्व परिसर मुक्त असेल. या भागात रेशीम उद्योग उभारणार असून, त्याचे क्लस्टर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक लोकांना येथेच रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. पुनर्वसनाचे प्रश्न ही मार्गी लावले जातील.’’ अहीर पुलाचा नारळ ९० मध्ये फोडला होता; पण कामाचा पत्ता नव्हता. आपण नारळ न फोडताच थेट कामे करतो, असेही शिंदे यांनी सांगितले. प्रारंभी एकनाथ शिंदे यांनी उत्तेश्वर देवाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.

धरणाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

तापोळ्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या सोळशी धरणाच्या सर्वेक्षणाच कामही सुरू केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून हे धरण झाल्यास भागाला पाणी मिळेल, असे सांगितले. सध्याच्या धरणातील पाणी खाली गेले, की लोकांची अडचण होते, तसेच गाळाने धरण भरले असून गाळ काढल्यास १०५ टीएमसीच्या धरणात १२५ टीएमसी पाणी भरेल व स्थानिक लोकांना बारमाही पाणी मिळेल, यासाठी जिल्हाधिकारी यांना धरणातील गाळ काढण्याचे सूचना दिल्या आहेत.

CM Eknath Shinde Maratha Reservation
Hasan Mushrif : बिद्री गेली आणि आता जिल्हाध्यक्षपदही गेलं..; मुश्रीफांनी 'या' नेत्याचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

मुख्यमंत्री साहेब पाणी घ्या...

उत्तेश्वर देवाच्या दर्शनासाठी पायऱ्या चढून जात असताना पायऱ्यांवर मुले ताक, दही व पाणी घेऊन विकत बसली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करत असताना मुलांनी पाण्याचा ग्लास पटकन घेत मुख्यमंत्र्यांना पाणी पिण्याची विनंती केली. छोट्याशा या मुलांचे प्रसंगावधान पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. दुर्गम भागातील महिलांनी झुणका भाकरी विकावयास ठेवलेली मुख्यमंत्र्यांनी पाहिली. त्यावर त्यांनी या स्टॉलवर झुणका भाकरीची ऑर्डर दिली. मुख्यमंत्र्यांना स्टॉलसमोर पाहून या महिला आनंदून गेल्या. आपल्यासोबत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वत: झुणका भाकर वाटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.