NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही गटाकडून मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. यादरम्यान शिवसेनेत देखील अस्वस्थता दिसून येत आहे.
राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशीरा तडकाफडकी नागपूरहून मुंबईला परत आले आहेत. यासोबतच शिंदेंचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला असल्याने चर्चेला उधाण आले.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्रात विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती या आज गडचिरोली येथील गोंडवना विद्यापिटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कर्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे देखील उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र या कार्यक्रमाआधीच एकनाथ शिंदे घाईने मुंबईला परतले आहेत. यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचा चर्चेला उधाण आले आहे.
नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नेते सरकारमध्ये सामिल झाले आहेत. आता त्यांना कुठली खाती देण्यात येणार यावरू चर्चा सुरू आहेत.
यादरम्यान शिंदेंच्या गटातील इच्छुक नाराज असल्याचे सांगितले जात आहे. नेत्यांची नाराजी दूर करून लवकरच मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढत आहे. राष्ट्रवादीच्या आणदारांच्या शपथविधीदरम्यान शिंदे गटातील एकाही नव्या आमदाराला मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नाही, त्यामुळे या सगळ्या परिस्थिती हाताळण्यासाठी एकनाथ शिंदे तडकाफडकी मुंबईला परतल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.