Eknath Shinde
Eknath Shinde

CM Shinde Diwali: नक्षलदृष्ट्या संवेदनशील, अतिदुर्गम पिपली बुर्गीत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस जवानांना मिठाई भरवली
Published on

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलदृष्ट्या संवेदनशील व अतिदुर्गम भागातील पिपली बुर्गी इथं पोलीस जवानांसोबत तसेच ग्रामस्थांसोबत बुधवार (ता. १५) दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना मिठाई भरवली. (CM Eknath Shinde celebrates Diwali in Naxal sensitive remote Pipli Burgi area with Maharashtra Police)

Eknath Shinde
IND vs NZ Semi-Final: वानखेडेवर रोहितची खेळी, ट्रेंड अन् वडापाव विक्रेत्याची चांदी; काय आहे प्रकार जाणून घ्या

एटापल्ली उपविभागाअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पिपली बुर्गी पोलीस स्टेशन इथं उभारण्यात आलेल्या नवीन विविध वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या दरम्यान येथील महाजनजागरण मेळाव्यास उपस्थित राहून गडचिरोली पोलीस जवान आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी तसेच महिला पोलीस अंमलदार व स्थानिक महिला भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली. (Latest Marathi News)

Eknath Shinde
Ajit Pawar: अजित पवारांना चलाख अन् धुर्त म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले...

यावेळी पिपली बुर्गी पोलिस स्टेशन येथील नवीन प्रशासकीय इमारत भूमीपूजन, पोलिस अंमलदार बॅरेक आणि अधिकारी विश्रामगृहाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्यानंतर संपूर्ण पोलिस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी करून महाजनजागरण मेळाव्यास उपस्थित नागरिकांना धोतर, साड्या, मच्छरदानी, ब्लॅंकेट, स्प्रे पंप, फास्टफुड कीट, लोणचे पापड कीट व इतर जीवनावश्यक भेटवस्तू व साहित्याचे वाटप केलं.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, नोटबुक, कंपास बॉक्स, बिस्कीट पॉकेट, चॉकलेट्स, व्हॉलिबॉल नेट व बॉल, क्रिकेट साहित्य (बॅट, स्टम्प्स, बेल्स व बॉल) आदी साहित्यांचे वाटप करून आदिवासी बांधवांसोबत तसेच नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. (Marathi Tajya Batmya)

Eknath Shinde
MP Election 2023: प्रियंका गांधींकडून PM मोदींची सलमान खानशी तुलना; प्रचार सभांमध्ये टिका-टिप्पण्यांचा ऊत

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोली पोलिस दलाच्या मागील कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या. तसेच पोलिस जवान हे न घाबरता आपले काम करत असून आपल्या घरापासून दूर राहून देशाचे, राज्याचे रक्षण करत असतात. येथील विशेष अभियान पथकाची टीम अतिशय सक्षम टीम आहे व केंद्रीय मंत्रीदेखील गडचिरोली पोलिस दलाचे नाव घेतात अशा शब्दात त्यांनी गडचिरोली पोलीस दलाचं मनोधैर्य वाढवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()