CM Shinde : आधी फडणवीस नंतर महाजनांशी मुंख्यमंत्र्यांची गुप्त चर्चा! शिंदे तडकाफडकी 'वर्षा'वर... नेमकं 'राज'कारण काय?

cm Shinde fadnavis govt
cm Shinde fadnavis govtsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सुरळीत चालावे यासाठी तिन्ही पक्षांची कसरत सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये नाराजीच्या चर्चा देखील समोर आल्या होत्या.

यादरम्यान काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दराआड चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात देखील बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल उलटसुलट चर्चा मंत्रालयात व आमदारांमध्ये सध्या सुरू आहे.

cm Shinde fadnavis govt
Maharashtra Rain Update : विदर्भ-मराठवाड्यासह राज्यात पाऊस कधी परतणार? IMD ने जारी केला अलर्ट, जाणून घ्या अपडेट्स

नेमकं झालं काय?

काल (१८ ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली. त्यानंतर, मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पाऊणतास खलबते झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या चर्चेवेळी सर्व पीए व सुरक्षा रक्षकांना बाहेर ठेवण्यात आले होते. तसेच बोलावल्याशिवाय कोणालाही आत पाठवायचे नाही अशी तंबी देखील देण्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

cm Shinde fadnavis govt
Nitin Gadkari CAG Report : 'कॅग'च्या रिपोर्टवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले, शेवटी मराठी माणसाला...

विशेष म्हणजे दोघांच्या बैठकिवेळी शिंदेंच्या मंत्रीमंडळतील दोन ज्येष्ठ मंत्र्यांसह चार ते पाच आमदारांनाही या बैठकीपासून लांब ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान महाजनांशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रालयात फार न रेंगाळता तडक मंत्रालयातून वर्षा निवासस्थानी रवाना झाले. त्यामुळे बंद दाराआड नेमकी कसली खलबते झाली, याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.