मुंबई : अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टचा वापर केला तसंच यावेळी त्यांच्यात चर्चा झाल्याच्या बातम्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण ही लिफ्ट सहाव्या मजल्यावर जात नाही, अशा शब्दांत मुख्यंमत्र्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. (CM Eknath Shinde comment on Uddhav Thackeray and Devendra Fadnavis lift meeting and discussion)
मुख्यमंत्री म्हणाले, "कोणी लिफ्ट मागितली तरी ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केली अन् काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळं आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं"
काही लोक बोलताहेत, काही वेगळा आनंद व्यक्त करत आहेत. तर काही लोक मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल पेढे वाटत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या २४० जागा आल्या, इंडिया आघाडीच्या सर्वांच्या मिळूनही तेवढ्या जागा आल्या नाहीत. तरीही काहीजण छाती फुगवून येताना आपण पाहतोय.
हे म्हणजे देशातील जनतेनं तुमचा पराभव केला आहे. खोटं नरेटिव्ह, खोट्या बातम्या पसरवून भीतीचं वातावरण निर्माण करुन सुद्धा मोदींना देशातील जनतेनं पुन्हा पंतप्रधानपदी बनवलं आहे. याचा आनंद विरोधक साजरा करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.