जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल; मुख्यमंत्र्यांचं आदित्य ठाकरेंना सडेतोड उत्तर

पंतप्रधान नरेंद मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आम्ही सातत्यानं संपर्क ठेवून आहोत.
Eknath Shinde vs Aditya Thackeray
Eknath Shinde vs Aditya Thackerayesakal
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आम्ही सातत्यानं संपर्क ठेवून आहोत.

सातारा : आमचे सर्वसामान्यांचे सरकार असून, आम्हाला सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्न सोडवायचे आहेत. विरोधकांच्या टीकेला कामाने उत्तर देऊ. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती योग्य वेळी प्रत्येकाला जागा दाखवत असते. जनतेला विश्वास आहे की, हे काम करणारे सरकार आहे. त्यामुळे आम्ही काम करत राहू आणि त्यांना टीका करत राहू देत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) विरोधांना लगावला आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे सध्या त्यांच्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या गावी दोन दिवस मुक्कामी आहेत. रात्री साडेसात वाजता त्यांनी ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांना देवाकडे काय मागणी केली, असे विचारले असता ते म्हणाले,‘‘राज्यातील जनतेला सुख-समाधान मिळू देत. राज्याची भरभराट होऊन वेगाने विकास होऊ देत,’’ अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde vs Aditya Thackeray
'सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखलासारखं तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही'

'नवीन उद्योग आणण्याचं काम आमचं सरकार करणार आहे'

राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) गेल्याबाबत विचारले असता ते म्हणाले,‘‘नवीन प्रकल्प येत आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क ठेवून आहोत. राज्याच्या विकासाबद्दल आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. आगामी काळात मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील. जे महाराष्ट्रातून प्रकल्प गेलेत, त्याबद्दल जे आरोप होत आहेत, त्याला जबाबदार कोण, हे उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून मला कुठलेही राजकारण करायचे नाही. या राज्याची भरभराट होऊन तरुणांच्या हाताला काम मिळावे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यासाठी राज्यात नवीन उद्योग आणण्याचे काम आमचे सरकार करणार आहे.’’

Eknath Shinde vs Aditya Thackeray
मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचा माजी मंत्री जखमी; डोळा, डोक्याला दुखापत

'त्यांच्या आरोपाला मला उत्तर द्यायचं नाही'

प्रकल्प बाहेर गेल्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,‘‘त्यांच्या आरोपाला मला उत्तर द्यायचे नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार असून, सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. शेतकऱ्यांना केवळ सुका दिलासा देऊन काम होत नाही. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली आहे. नुकसान भरपाईचे निकष दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केले आहेत. निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांना मदत केली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून, त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ. राज्यातील जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी प्रत्येकाला जनता जागा दाखवत असते. जनतेला विश्वास आहे, हे काम करणारे सरकार असून, आम्ही काम करत राहू, त्यांना टीका करत राहू देत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.