Maharashtra Politics : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत वर्षावर खलबतं; अधिवेशनासह 'या' मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit pawar
Updated on

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल (सोमवार, १७ जुलै) पासून सुरू झालं आहे. या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर हे सर्व नेते सलग दोन दिवस वाय.बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला पोहचले. त्यांच्याकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यादरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री उशिरपर्यंत वर्षावर बैठक पार पडली.

अधिवेशन त्याच बरोबर आज होणारी NDA च्या घटक पक्षातील बैठकांबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणूकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना रोखण्यासाठी आज विरोधक आज बेंगळुरूमध्ये एकवटत असताना राज्याच्या दोन प्रमुखांची अधिवेशनच्या काळात होणारी ही बैठक महत्वाची माणली जात आहे. रात्री ११ :३० वा देवेंद्र फडणवीस हे बैठकीसाठी वर्षावर दाखल झाले. ते रात्री उशिरा १२:३० वा नंतर वर्षाहून बाहेर पडले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit pawar
"EDचा धाक शरद पवार बाप, मोदी वॉशिंग पावडर"; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाकडून पोस्टरबाजी | Sharad Pawar

नवी दिल्ली येथे २०२४ च्या लोकसभा निवडणुका सलग तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी भाजपची रणणीती ठरवली जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज NDA च्या घटकपक्षांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत.

विरोधकांची एकी होत असताना आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा NDA ची तिसऱ्यांदा सत्ता कशी आणता येईल यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपकडून संध्याकाळी ५ वाजता हॉटेल अशोका या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला ३८ मित्रपक्ष उपस्थित रहातील असा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दावा आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit pawar
Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार गटाच्या विनंतीवर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्र्वादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटालाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.