मुंबई : आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे. यामध्ये २०१९ पूर्वीच्या रखडलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात अॅग्री बिझनेसवर एकही रूपया खर्च झाला नाही, हे रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
(Devendra Fadnavis ON CM Meeting)
राज्यातील एकही प्रकल्प रखडणार नाही आणि रखडलेले प्रकल्प ट्रॅकवर नेऊ असा 'पण' मी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे असं ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत जागतिक बॅकेने दिलेले पैसे खर्च करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उपमुख्यमंत्र्यानी दिली आहे. हा रखडलेला प्रकल्प परत सुरू करण्यात येणार असून यावेळी जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही याचीही ग्वाही जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सांगली आणि कोल्हापूरच्या पूराबाबतही चर्चा करण्यात आली आहे. हे पूराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येईल का असा विचार करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेनेसुद्धा सहमती दर्शवली आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.
याव्यतिरिक्त समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आले आहेत. जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी बोगद्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाठवण्यात येणार असल्याची माहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.