Eknath Shinde: "देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा घरात बसणाऱ्यांनी करू नये," एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: यामध्ये त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal
Updated on

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुबईतील रंगशारदा येथे शाखा प्रमुखांचा मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. तर फडणवीसांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे.

आता या प्रकरणात उडी घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीसांची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे नाव न घेता म्हणाले, "घरात बसून आणि फेसबुक लाईव्ह करून काही होत नसते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा घरात बसणाऱ्यांनी करू नये."

दरम्यान काल झालेल्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे म्हणाले होते की, "मला आणि अदित्यला खोट्या आरोपांवरून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता."

यावेळी ठाकरे फडणवीसांचा उल्लेख टाळत म्हणाले होते की, "एकतर तू राहशील नाहीतर मी."

Uddhav Thackeray Eknath Shinde
Devendra Fadnavis News: फडणवीस दिल्लीत जाणार? पक्ष मोठी जबाबदारी देणार?

अनिल देशमुखांचे आरोप

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला होता की, फडणवीस यांनीच त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांना तुरुंगात टाकण्याची योजना आखली होती.

माजी गृहमंत्री देशमुख यांनी आरोप केला होता की फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या लोकांविरुद्ध प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले होते.

देशमुख यांनी केलेल्या या खुलाशानंतर ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन!

विधानसभेची तयारी

पुढील दोन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहे. तर युती-आघाड्यांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

दुसरीकडे सर्वच पक्षांमध्ये एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपालाही सुरूवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.