Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीवरुन वाद पेटणार? CM शिंदे म्हणाले, फडणवीस आणि आमच्यात कोणतेही मतभेद..

प्रसारमाध्यमांत आलेल्या जाहिरातीवरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath ShindeEsakal
Updated on
Summary

जनतेने आमच्या सरकारला खऱ्या शिवसेना व भाजप युती सरकारला पसंती दिली आहे. हा जनतेचा मोठेपणा आहे.

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्वच मंत्री एकजुटीने काम करत असून, सरकारच्या कामाचे श्रेय हे सर्वांचे आहे, असे सांगतानाच आजची जाहिरात ही सरकारची नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.

आजच प्रसारमाध्यमांत आलेल्या जाहिरातीवरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमानंतर श्री. शिंदे यांची पत्रकारांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

ते म्हणाले, ‘‘माझे सहकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्वच सहकारी या सगळ्यांचे श्रेय आहे. खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील योजनांना आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळेच आम्ही जोमाने काम करू शकतो. अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Kagal : आक्षेपार्ह स्टेटसमुळं कागलमध्ये तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांचं शांततेचं आवाहन

मुंबईपासून ते राज्यभरापर्यंत आपण एक-एक प्रकल्प बघितला, तर प्रत्येक प्रकल्प हजारो, लाखो, करोडो लोकांना दिलासा देणारा आहे. त्यामुळेच जनतेने आमच्या सरकारला खऱ्या शिवसेना व भाजप युती सरकारला पसंती दिली आहे. हा जनतेचा मोठेपणा आहे, हा एकट्या कुठल्या एकनाथ शिंदे यांचा नाही.’’

आजच्या जाहिरातीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र नाही. याबाबत ते म्हणाले, ‘‘ही जाहिरात सरकारची नाही. जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील ज्या भावना आहेत, त्या माध्यमातून दिसून आल्या आहेत. आम्ही आमचे काम करत राहू, विरोधक आरोप करत राहतात. आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही. आरोप जेवढे करतील, त्याच्या दुप्पटीने आम्ही काम करू.’’

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Satara : छ. शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही करण्याचं धाडस करू नका; पालकमंत्र्यांना स्पष्ट इशारा

..अन्‌ मुख्यमंत्री अडखळले

काल प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या जाहिरातीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र नाही, यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता ते सुरुवातीला अडखळले आणि स्वर्गीय ठाकरे यांच्या छायाचित्राविषयी काहीही न बोलता त्यांनी ही जाहिरात सरकारची नसल्याचे सांगत वेळ मारून नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.