भाजपा पुरस्कृत CM होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला - संजय राऊत

महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे; राज्यपालांच्या विधानावर राऊत भडकले!
Sanjay Raut BhagatSingh Koshyari
Sanjay Raut BhagatSingh KoshyariSakal
Updated on

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या आणखी एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. मुंबईतून गुजराती माणूस गेला तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी काल केलं होतं. त्यामुळे आता विरोधकांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Sanjay Raut on Bhagatsingh koshyari controversial statement)

शिवसेना खासदार संजय राऊतही (Sanjay raut) कोश्यारींच्या या विधानावर चांगलेच संतापले आहेत. कोश्यारींचा साधा निषेध तरी करा, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना (CM EKnath Shinde) चांगलंच धारेवर धरलं आहे. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला.स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.

Sanjay Raut BhagatSingh Koshyari
संजय राऊत यांच्या ट्रॅपमधून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं, बावनकुळेंचा सल्ला

संजय राऊत पुढे म्हणाले की, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी आणि आता काय हा मराठी माणूस, महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.दिल्ली पुढे किती झुकताय?

Sanjay Raut BhagatSingh Koshyari
गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई आर्थिक राजधानी नाही; राज्यपालांच्या विधानामुळे वाद

शिंदे गटासह भाजपावर संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये राऊत म्हणतात, आता तरी ऊठ मराठ्या ऊठ. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत, मराठ्या तुलाच उठावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.