Ajit Pawar: अजित पवारांच्या 'त्या' विधानाने शिंदे गटात अस्वस्थता; भाजपकडे केली अजितदादांना आवरण्याची मागणी?

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलेला प्रश्न शिंदे गटातील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे
Maharashtra politics
Maharashtra politicsEsakal
Updated on

ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आता याच मुद्यावरुन शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला. त्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली आहे. त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता नारीजीचे सुर आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

Maharashtra politics
Jayant Patil : अजित पवार यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ट्वीट करून कष्टाळू आणि गतीशील मुख्यमंत्री अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांची प्रशंसा केली होती. मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली असताना ठाण्यातील घटनेचे निमित्त करून राजकीय कुरघोडी करण्याच्या अजित पवार यांच्या प्रयत्नांबद्दलही शिंदे गटात नाराजी आहे.

Maharashtra politics
Section 353A : आमदारांना आमदारांच्या मागणीला यश! प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा देणाऱ्या कायद्यात होणार सुधारणा

अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राष्ट्रवादीत बंड केल्यापासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होणारा त्यांचा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतो. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे वस्तुस्थिती काय आहे, अशी विचारणा केली होती. त्यानंतर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

अजित पवार यांनी थेट सवाल केल्याने शिंदे यांना ते फारसे रुचले नसल्याची चर्चा शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आहे. अशा वेळी भाजपनेते आणि विशेषत: फडणवीस यांची भूमिका काय असेल याकडे शिंदे गटाचे लक्ष आहे. अजित पवार यांना भाजपबरोबर घेण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळेच शिंदे आणि पवार यांच्यात आणखी कटुता निर्माण झाल्यास भाजप नेतृत्व कोणाला झुकते माप देईल, याचीही चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

Maharashtra politics
Talathi Exam : तलाठी पेपरचे शेकडो स्क्रीनशॉट? मोठ्या रॅकेटची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com