CM Eknath Shinde:दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग, मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

दसरा मेळाव्याच्या व्यवस्थापनीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, पदाधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारी
Dasara Melava  Ekanath Shinde
Dasara Melava Ekanath Shindeesakal
Updated on

Dasara Melawa:शिवसेनेकडून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी 'दसरा मेळावा' घेतला जातो. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे महत्वाचे खासदार, आमदार, नेते उपनेते आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दसरा मेळाव्याच व्यवस्थापन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. शिंदे गटाकडून सभेसाठी दोन मैदानांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी कोणत्या मैदानावर सभा घ्यायची, यावर देखील चर्चा करण्यात आली.

Dasara Melava  Ekanath Shinde
Police Bharti : तीन हजार कंत्राटी पोलिसांच्या भरतीला मंजुरी; राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रक्रिया राबवण्यात येणार

शिवसेनेत फूट पडण्याआधी दसरा मेळावा शिवाजी पार्क याठिकाणी घेतला जात होता. पक्षफुटीनंतर दोन वेगवेगळे मेळावे घेतले जाऊ लागले. यावर्षी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आग्रही होते. त्यानंतर शिंदे गटाने माघार घेतल्यामुळे ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर 'दसरा मेळावा' घेण्याची परवानगी मिळाली.

त्यानंतर शिंदे गटाने मेळावा घेण्यासाठी दोन मैदानांना पसंती दिली होती. यामध्ये चर्चगेटच्या क्रॉस मैदानाचा समावेश होता. यंदा दसरा मेळाव्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ बघायला मिळू शकते. (Latest Marathi New)

Dasara Melava  Ekanath Shinde
Bihar Train Accident:'ट्रेनचा वेग १२८ किमी, अचानक धक्का बसला अन् नंतर...'! बिहार रेल्वे दुर्घटनेमागचं कारण समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.