Eknath Shinde : CM शिंदे हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे रवाना झाले, पण मध्येच असं नेमकं काय घडलं की त्यांना..

मुख्यमंत्र्यांच्या पुढील प्रवासासाठी वाहनांचा ताफाही ठेवला तैनात
CM Eknath Shinde Helicopter Landed in Satara
CM Eknath Shinde Helicopter Landed in Sataraesakal
Updated on
Summary

साधारण २० मिनिटांतच त्यांच्या हेलिकॉप्टर खराब झाल्याने पुन्हा तातडीने राजभवन हेलिपॅडवर उतरविण्यात आले.

सातारा : मुंबईहून आपल्या दरे (महाबळेश्वर) गावाकडे दोन दिवस मुक्कामी निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) खराब झाल्यामुळे पुन्हा राजभवन हेलिपॅडवर तातडीने उतरविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने ते दरे गावाकडे निघाले.

मात्र, महाबळेश्वर परिसरात पाऊस असल्याने हवामान खराब झाल्याने ते साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरले. येथे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांचे स्वागत केले. अल्प वेळ शासकीय विश्रामगृहात थांबून शासकीय वाहनाने ते दरेकडे रवाना झाले.

CM Eknath Shinde Helicopter Landed in Satara
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस आपल्या दरे या मूळगावी मुक्कामी येणार होते. यासाठी सकाळी राजभवन येथून हेलिकॉप्टरने टेक ऑप केला. साधारण २० मिनिटांतच त्यांच्या हेलिकॉप्टर खराब झाल्याने पुन्हा तातडीने राजभवन हेलिपॅडवर उतरविण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्याकडे रवाना झाले; पण महाबळेश्वर परिसरात पाऊस पडत असल्याने हवामान खराब झाले होते. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्याला आणण्यात आले. येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले.

CM Eknath Shinde Helicopter Landed in Satara
INDIA Alliance : देशात 'इंडिया अलायन्स' भक्कम, शरद पवार सुद्धा..; उलट-सुलट चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

मुख्यमंत्री साताऱ्यात येणार असल्याचे समजताच पालकमंत्री देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह अधिकारी हेलिपॅडवर उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांच्या पुढील प्रवासासाठी वाहनांचा ताफाही तैनात ठेवला.

CM Eknath Shinde Helicopter Landed in Satara
अंतर्वस्त्रात डिव्हाईस-मायक्रोफोन, कॉपीसाठी दहा लाखांची 'डील'; वनविभागाच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

हेलिपॅडवर आगमन होताच पालकमंत्री देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पोलिस दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे अल्पवेळ शासकीय विश्रामगृहात थांबले. येथे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी काही सूचना केल्या. तेथून ते शासकीय वाहनाने दरे गावाकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.