Eknath Shinde: मी CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाहीतर कॉमन मॅन; एकनाथ शिंदेंची विधानसभेत फटकेबाजी, ठाकरे पिता-पुत्र टार्गेट

Eknath Shinde : अधिवेशनात काही लोक आमदारकी वाचवण्यासाठी मध्येच सभागृहात हजेरी लावतात, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सभागृहात ऑनलाइन उपस्थित राहता येत नाही, म्हणूनच ते येतात; नाहीतर त्यांनी घरातून उपस्थिती लावली असती, अशी टिपणीही त्यांनी केली.
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

Eknath Shinde

मुंबई, ता. १ : ‘‘राज्यातील शेतकरी कोमात गेल्याचे वक्तव्य करून विरोधकांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. खरेतर, राज्यातील विरोधकच कोमात गेले आहेत. त्यामुळे दरवेळी त्यांच्याकडून एकच स्क्रिप्ट वाचली जात आहे,’’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यावेळी त्यांनी विरोधकांसह ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल केला.

विधानसभेत विरोधकांनी २९३ चा प्रस्ताव मांडला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली.

ते म्हणाले,‘‘अंतरिम अर्थसंकल्प असतानाही सर्व घटकांना न्याय दिला आहे. शेतकरी, गोरगरीब, महिला, युवक या सर्वांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मात्र त्याचा अभ्यास न करताच विरोधकांकडून टीका केली जात आहे. किमान कधीतरी चांगल्या गोष्टीला चांगले म्हणायला शिकले पाहिजे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे ऊठसूट चहापानावर बहिष्कार टाकायचा, एकाच विषयावर चर्चा करायची, मुद्दे सोडून गुद्यावर यायचे, पक्ष आणि चिन्ह चोरले म्हणून ओरडत फिरायचे; हे आता बंद करा.’’

अधिवेशनात काही लोक आमदारकी वाचवण्यासाठी मध्येच सभागृहात हजेरी लावतात, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सभागृहात ऑनलाइन उपस्थित राहता येत नाही, म्हणूनच ते येतात; नाहीतर त्यांनी घरातून उपस्थिती लावली असती, अशी टिपणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,‘‘विरोधकांना शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही. त्यांनी केवळ पोकळ घोषणा केल्या. आम्ही केलेल्या घोषणा पूर्ण केल्या. असे असताना विरोधकांनी ‘शेतकरी कोमात आहे’, अशी टीका केली. ही भाषा योग्य नाही. शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तर तुम्ही तोंडाला पाने पुसली. तुम्ही प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार दिले नाही. आम्ही मात्र ते खात्यावर जमा केले.’’

Eknath Shinde
Election Commission: जात, धर्म अन् भाषेच्या आधारे मत मागणाऱ्यावर कारवाई होणार, लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोगाच्या कडक सूचना

मुख्यमंत्री म्हणाले..

- मुंबईत तूर्तास पाणी कपात नाही
- आशा कर्मचाऱ्यांना सरकार न्याय देईल
- राज्यातील राजकीय प्रदूषण धुवून काढणार
- काही विभागात नोकरभरती जाहीर केली आहे, त्यात मराठा आरक्षण लागू करणार

‘नानांनाही तसंच वाटतं’-

मुख्यमंत्री शिंदे यांनी, आपण स्वत:ला ‘सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाहीतर कॉमन मॅन’ समजतो. यावर मागून शंभूराज देसाई यांनी ‘नानांना नाही पटलं हे’, असा टोला लगावला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, ‘नानांनाही मी त्यांचा मुख्यमंत्री वाटत’ असल्याची टिपणी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानावर समोर बसलेल्या नाना पटोलेंनी ‘ते माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले’, अशी कोपरखळी मारताच मोठा हशा पिकला. तर यापुढे जाऊन शिंदे यांनी, ‘हे खरं आहे. विजयराव (विजय वडेट्टीवार), ये अंदर की बात है, हे सगळे ठरलेले होते’, अशी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात पुन्हा हशा पिकला.

आणखी बरेच येतील-

‘‘देशाला मोदींची गँरटी आहे. म्हणूनच अजित पवार इकडे आले, अशोक चव्हाणही आले. अजूनही पुढे बरेच काही होणार आहे,’’ असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाना पटोले यांनी डिवचले. यावर, ‘येणार असतील तर घ्या,’ असे पटोले म्हणताच ‘तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल,’ असा टोला शिंदे यांनी लगावला.

Eknath Shinde
Sharad Pawar: "जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात भिडतात"; प्रति, महायुती सरकारला विधिमंडळाच पत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()