ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंढरपूरच्या महापूजेसाठी आमंत्रण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाला असून याचे आमंत्रण त्यांच्या घरी पोहोच झाले आहे
cm eknath shinde invite to pandharpur for aashadi
cm eknath shinde invite to pandharpur for aashadi
Updated on

सध्या राज्यात आषाढी वारीचे वारे वाहत आहेत. दिंडीतून अनेक वारकरी पायी पंढपुराकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, यंदाच्या महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाला असून याचे आमंत्रण त्यांच्या घरी पोहोच झाले आहे. ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणतात की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला. (cm eknath shinde invite to pandharpur for aashadi)

cm eknath shinde invite to pandharpur for aashadi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून डिपीडीसी कामांना ब्रेक; राज्यासाठी आदेश

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदरांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारले. यानंतर अनेक राजकीय सत्तानाट्य घडली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यंदा ठाकरेंना हा मिळणार का अशी चर्चाही मध्यंतरी रंगली होती. मात्र यंदा हा मान एकनाथ शिंदेंना मिळाला आहे.

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे.

आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. मात्र, यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की देवेंद्र फडणवीस जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळं शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेना मिळणार आहे.

cm eknath shinde invite to pandharpur for aashadi
सामंत, केसरकर आयत्या बिळावर नागोबा: विनायक राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.