मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची राजकीय ताकद वरचेवर वाढतच चाललीय. राज्यातील बहुतांश सगळीकडचं पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यानंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला शिंदे गटाला पाठिंबा दर्शवलाय.
दरम्यान, आज दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी लवकरात-लवकर पूर्ण बरं होऊन राजकीय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हावं, यासाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यानं रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तिकर यांना दिलेला होता. ही शस्त्रक्रिया होऊन नुकतंच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीनं त्यांच्या निवासस्थानी जाऊन कीर्तिकरांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सध्या किर्तीकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या तब्बल 12 खासदारांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नाही तर या 12 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्रही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.