राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत CM एकनाथ शिंदेंचं 'मिशन 200' फेल!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मतं मिळवून देऊ असा निर्धार त्यांनी केला होता.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSakal
Updated on

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मतं मिळवून देऊ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण त्याचं हे 'मिशन 200' फेल झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्याची आकडेवारीही समोर आली आहे, याचं गणित काय? ते समजून घेऊयात. (CM Eknath Shinde mission 200 failed in presidential election)

Eknath Shinde News
PM मोदींनी प्रत्यक्ष भेट घेत नवनिर्वाचित राष्ट्रपतींना दिल्या शुभेच्छा

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्यामदतीनं नव सरकार स्थापन केलं. यासाठी जेव्हा विधानसभेत नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला. तेव्हा शिंदे सरकारला १६४ मतं मिळाली होती, तर विरोधकांना ९९ मतं. दरम्यान, आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संपूर्ण शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर शिंदे गटाकडे १८५ मत अपेक्षित होती. यामध्ये शिंदे गटातील एक आमदार मतदान करु शकला नाही, त्यामुळे एक मत वजा होता १८४ मतं त्यांच्याकडं होती तर विरोधकांकडे ९९ मतं.

Eknath Shinde News
Nitesh Rane: महाराष्ट्रातही आता धर्मांतरविरोधी कायदा आणा; नितेश राणेंची मागणी

पण आता शिंदे गटाला १८१ मतं मिळाली तर विरोधी गटाला ९८ म्हणजे विरोधी पक्षातील एक मत कमी झालं. पण शिवसेनेनं पाठिंबा दिल्यावरही NDA १८४ आकडा गाठू शकलं नाही, कारण महाराष्ट्रातील चार मतं बाद झाली. यामुळं मुख्यमंत्र्यांचं मिशन २०० फेल झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.